Headlines

”बनारसच्या घाटावर तासनतास मृतदेह जळताना पाहायचो”, Vicky Kaushal नं सांगितलेला ‘तो’ अनुभव

[ad_1]

Vicky Kaushal News: विकी कौशल हा आजच्या काळातला एक गुणी आणि सर्वांचाच आवडता अभिनेता आहे. दोन वर्षांपुर्वी कतरिना कैफशी लग्न झाल्यानंतर विकी कौशल हा चर्चेत आला होता. नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘गोविंदा मेरा नाम’ (Vicky Kaushal Latest Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आलेला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. 2015 सालेली आलेल्या मसान या चित्रपटानंतर विकी कौशलच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. त्यानंतर विकी कौशलचे अनेक चित्रपट हे आले ज्यातून विकीनं आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले होते.

त्यानंतर विकी हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला होता. परंतु त्याचा हे यश इतकं सोप्पं नव्हतं. त्यातून आपल्या पहिल्या चित्रपटाच्यावेळी (Vicky Kausal Masaan) मात्र त्याला अनेक संघर्षातून जावे लागले होते. 

विकी कौशल याने एकेकाळी बनारसच्या घाटावर मृतदेहांना चितेवर जळताना पाहिले होते. त्याचा स्ट्रगल काही सोप्पा नव्हता. मसान या चित्रपटाच्या वेळी मात्र त्याला असाच संघर्षही करावा लागला होता. आपण कायमच ऐकतो की कलाकार हे चित्रपटाच्या भुमिकेसाठी चांगलीच मेहनत घेताना दिसतात. तशीच मेहनत विकी कौशल यानंही घेतली होती. मसान या चित्रपटाच्या वेळची ही गोष्ट आहे. आपली या चित्रपटातील भुमिका ही अधिक खरी व्हावी यासाठी त्यानं तासनतास बनारसच्या घाटाजवळ मृतदेह (Vicky Kaushal Used to Watch Dead Bodies) चितेवर जळताना पाहिले होते. 

येत्या काही दिवसांनी विकी कौशल आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याबद्दल ‘मसान’ या चित्रपटाला 4 वर्षे पुर्ण झाली तेव्हा आपल्या इन्टाग्राम पेजवरून त्यानं याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर याची बरीच चर्चाही झाली होती. यावेळी त्यानं मणिकर्णिकास, बनारस इथला फोटो पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला होता. त्यानं आपला हा संपुर्ण अनुभव हा थोडक्यात कथन केला होता. त्यावर बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांच्या कमेंट्सही आल्या होत्या, तसेच चाहत्यांनीही त्यावर अनेक प्रकारच्या संमिश्र कमेंट्स पाहायला मिळत आहेत. 

हेही वाचा – फॅशन का जलवा! मौनी रॉयसमोर Disha Patani पडली फिकी, टाईट मिनी ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर…

सध्या कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या बेबी प्लॅनिंग (Vicky Kaushal Baby planning) सगळीकडेच चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये याची जोरात चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी आलेल्या बातमीनुसार, कतरिना आपल्या काही मुख्य चित्रपटांचे चित्रिकरण पुर्ण झाल्यानंतर बेबी प्लॅनिंगचा विचार करत असल्याचे कळले आहे. त्यामुळे सगळीकडेच चर्चांना उधाण आले आहे.

विकी आणि कतरिना हे सोशल मीडियावर चांगलचे सक्रिय असतात. त्यातून ते एकमेकांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *