Headlines

धक्कादायक! संपत्तीसाठी वयोवृद्ध अभिनेत्रीला पोटच्या मुलानं संपवलं

[ad_1]

Actress Veena Kapoor Killed by Her Son : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचं महत्त्व काय आहे हे सांगण्याची कोणाला गरज नाही. शाळेतून, ऑफिसवरून किंवा फिरायला जाऊन आल्यावर जेव्हा प्रत्येक व्यक्ती घरी येते तेव्हा आई कुठे आहे हा प्रश्न विचारते. घरात आई नसेल तर घराला घरपण नाही असं वाटू लागतं. पण अशा परिस्थितीत एका मुलानं तर संपत्तीसाठी जन्मदेती आईचा खून केला. आईवर बेसबॉल बॅटने हल्ला करत मुलाने आईचे प्राण घेतले. जुहूमध्ये एका महिलेच्या हत्येनंतर मृतदेह सापडल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. दरम्यान, आता ही महिला कोण होती त्याची बातमी समोर आली आहे. ही महिला दुसरी कोणी नसून ज्येष्ठ अभिनेत्री वीणा कपूर (Actress Veena Kapoor) होत्या. वीणा कपूर या 74 वर्षांच्या होत्या असे म्हटले जाते. धक्कादायक म्हणजे वीणा यांच्यावर त्यांच्या मुलानं संपत्तीसाठी हल्ला केला होता. 

वीणा यांच्यावर मुलानंच केला हल्ला 

वीणा यांच्यावर त्यांच्या 43 वर्षीय मुलानं बेसबॉल बॅटनं मारहाण करत हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर वीणा यांच्या मुलानं त्यांचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरून माथेरान येथील दरीमध्ये टाकून दिला. संपत्तीवरून वीणा आणि त्यांच्या मुलामध्ये वाद सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 कोटीं रुपयांच्या फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी मुलाने आईची हत्या केली आहे. तर आईच्या मृत्युचे पुरावे नष्ट करण्यास सचिनला मदत केलेल्या नोकराचं नाव छोटू उर्फ लालकुमार मंडह असं आसून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सध्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 

हेही वाचा : मुलाला आईपेक्षा जास्त संपत्ती जवळची; जन्मदातीचा मृतदेह फेकला माथेरानच्या दरीत

दरम्यान, अभिनेत्री नीलू कोहली यांनी (Nilu Kohli) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. विरल भयानीनं शेअर केलेली पोस्ट शेअर करत नीलू म्हणाल्या, ‘वीणाजी तुम्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होतात. मला प्रचंड वाईट वाटतंय. तुमच्यासाठी हे लिहिताना मी नि:शब्द झाले आहे, इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर तुम्हाला शांतता मिळेल अशी आशा आहे.’

वीणा कपूर यांचा मोठा मुलगा अमेरिकेत असून त्या धाकटा मुलगा सचिनसोबत मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होत्या. वीणा आणि सचिन यांच्यात सतत संपत्तीमुळे वाद होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. संपत्तीमुळे वाद होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांना संशय आला आणि त्यांनी वीणा आणि सचिन यांच्या मोबाईलच्या लोकेशनबद्दल माहिती मिळवली. 

संपत्तीसाठी वीणा कपूर यांची हत्या केल्याची घटना जूहूच्या गुलमोहर रोड येथील कल्पतरू सोसायटीमधील आहे. सोसायचीचा सिक्युरिटी सुपयवायझर म्हणून काम करणाऱ्या जावेद अब्दुला मापारी यांनी वीणा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. त्यांनंतर पोलीस चौकशीत त्यांचा खून झाल्याचं समोर आलं आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *