Headlines

Ved on OTT: प्रतिक्षा संपली! ‘वेड’ चित्रपट आता पाहता येणार घरबसल्या, ‘या’ OTT वर होणार प्रदर्शित

[ad_1]

Ved on OTT: सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख या दोघांचा ‘वेड’ (Ved on Which OTT Platform) हा सुपरहिट चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Ved Box Office) अक्षरक्ष: धुमाकूळ घातला होता. रितेश आणि जेनिलियानं साकारलेल्या सत्या आणि श्रावणी या दोन पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या चित्रपटातील त्यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. गेल्या 20 वर्षांपासून रितेश आणि जेनिलियाच्या केमेस्ट्रीचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. जेनिलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट असला तरी तिच्याही अभिनयाचे सगळीकडून कौतुक झाले.  

आता तुमच्या या आवडत्या चित्रपटाचा आस्वाद तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. हो, तुम्ही बरोबर ओळखलंत. आता तुमचा हा लाडका चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या लेखातून जाणून घ्या की तुम्ही हा चित्रपट कधी, कुठे आणि केव्हा पाहू शकता? जे या चित्रपटाची (Ved OTT Release Date) ओटीटीवर येण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता ही वाट संपली आहे. (Ved marathi movie releasing on ott next weekend on 28th of april 2023 stay tuned to watch the premiere on disney plus hotstar)

या चित्रपटाचे दिग्दर्शन हे खुद्द रितेश देशमुख यानं केले होते. या चित्रपटाचा ट्रेलर पाहूनच ‘वेड’ (Ved Movie on Hotstar) चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला लागली होती. ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’च्या ऑफिशियल इन्टाग्राम पेजवरून त्यांनी ‘वेड’ या चित्रपटांची झलक सादर केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता फक्त काही दिवसच वाट पाहावी लागणार आहे. 

हेही वाचा – अंबानींच्या होणाऱ्या सुनेबाईंची दुबईमध्ये धमालमस्ती, मित्र-मैत्रिणींबरोबर साजरा केला अनंतचा बर्थडे, Photo व्हायरल

तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहिला असणार परंतु जर का तुम्ही हा चित्रपट अजूनही पाहिला नसेल तर तुमच्यासाठी आता एक चांगली संधी चालून आली आहे कारण जेनिलिया आणि रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट तुम्हाला लवकरच घरबसल्या पाहता येणार आहे. 28 एप्रिल रोजी हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तेव्हा तुम्हाला परत ‘वेड’ हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही घरबसल्या हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट हिंदी आणि मराठीमध्ये (Ved on OTT in Hindi and Marathi) प्रदर्शित होतो आहे. 

‘वेड’ हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली होती. पहिल्याच दिवशी हा चित्रपट कोट्यवधी रूपयांच्या घरात पोहचला होता. चित्रपटाचे संगीत अजय-अतूल यांचे होते. त्याचबरोबर चित्रपटाची स्टारकास्टही अत्यंत तगडी होती. संवाद, भुमिका, अॅक्शन्स सीन्स, नात्यांवरील भाष्य आणि जेनिलिया आणि रितेशची केमेस्ट्री यांमुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना अक्षरक्ष: ट्रीट मिळाली. त्यातून सर्वात मोठं आकर्षण होते ते म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf in Ved) यांची भुमिका. या चित्रपटात विद्याधर जोशी, जिया शंकर, शुभंकर तावडे यांचाही अभिनय पाहायला मिळाला होता.   



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *