Headlines

Vastu Tips of Ganesh Idol: घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका…होतं आर्थिक नुकसान…

[ad_1]

Vastu Tips of Ganesh Idol:  हिंदू धर्मात मूर्तीपूजेला विशेष महत्व आहे. आपल्या घरात देवघरात आपण देवांची स्थापना करतो, नित्यनेमाने त्यांची पूजा करतो, देवघरात देव एका विशिष्ठ दिशेने ठेवण्यास सांगितलं जात. वास्तुशास्त्रात घरात अनेक गोष्टी कोणत्या दिशेला असाव्यात किंवा असू नयेत याविषयी सांगितलं जातं…आपल्याकडे 4 दिशा आहेत त्याप्रमाणे प्रत्येक दिशेच महत्व आहे, जर चुकीच्या दिशेला एखादी वस्तू ठेवली तर त्याच फळ मिळत नाही किंवा काहीतरी चुकीचं घडत असं वास्तुशास्त्र सांगत. त्यामुळे दिशानुसार घरात  करायला सांगितलं जात 

देवघरात देवांची स्थापना तर आपण करतोच पण, काही देवांच्या मूर्ती आपण घरात ठेवतो त्याची आवड असते जस कि गणपतीच्या सुंदर मूर्ती आपल्याला देवघराव्यतिरिक्त इतर ठिकाणी ठेवायला आवडत. पण त्यासाठी सुद्धा शास्त्रात काही नियम आहेत ते आपण पाळले तर आपल्याला काही नुकसान होत नाही. 

सनातन धर्मात सर्वप्रथम गणपतीची पूजा करण्याचा नियम आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते. असे म्हणतात की जो कोणी श्रीगणेशाची भक्तिभावाने पूजा करतो त्याचे सर्व संकट दूर होतात. यासोबतच घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. मात्र, गणपतीच्या पूजेच्या वेळी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पूजेत काही चूक झाली असेल तर ती व्यक्तीसाठी अशुभ असते. याशिवाय गणपतीची मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापना करतानाही विशेष खबरदारी घ्यावी. (vastu tips do not keep lord ganesha statue in house this place otherwise you will face problems)

– घरामध्ये गणपतीची मूर्ती तेव्हाच स्थापित करा जेव्हा तुम्ही दररोज त्यांची पूजा आणि प्रार्थना करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर घरात मूर्तीची प्रतिष्ठापना करू नका.

– गणपतीची मूर्ती 18 सेमी पेक्षा जास्त उंच नसल्याची खात्री करा. या आकाराच्या मूर्तीची घरी पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.

– उजव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती खरेदी करू नका, कारण गणपतीच्या या स्वरूपाच्या पूजेचा विशेष नियम म्हणजे निष्ठा.

– घरामध्ये मूर्तीची स्थापना करताना त्यांचे तोंड मुख्य दरवाजाकडे असेल याची खात्री करा.

– बेडरूममध्ये गणेशाची मूर्ती बसवू नका.

– काही लोक शिडीखाली देवघर बांधतात. असे अजिबात करू नका तसेच या ठिकाणी गणपतीची मूर्ती बसवू नका.

– गणपतीच्या उजव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती ठेवा. माँ लक्ष्मी ही आदिशक्ती आहे जी गणपतीची आई आहे. त्यामुळे गणपतीच्या डाव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती ठेवायला विसरू नका.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *