Headlines

Vastu Tips: घरात हे बदल केल्यास दिसेल सकारात्मक बदल, जाणून घ्या काय सांगते वास्तूशास्त्र

[ad_1]

Vastu Tips For Happy Home: ज्योतिषशास्त्रानंतर वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित होतं. वास्तुशास्त्रात घरातील वस्तू कुठे असावी याची माहिती दिली आहे. प्रत्येक दिशेनुसार वस्तूंची मांडणी वास्तुशास्त्रात केली आहे. अष्टदिशा आणि त्यांचे स्वामी हा वास्तुशास्त्राचा गाभा आहे. वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला एक स्वामी नेमला आहे. ह्या स्वामींच्या आवडी-निवडी व स्वभाव त्यांनीच ठरवले आहेत. मनासारखे घडले तर ते प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्राचे नियम सुखी आणि समृद्ध जीवनासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. वास्तूचे काही मूलभूत नियम घरात पाळले तर अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-समृद्धी येईल. घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवल्याने सकारात्मक परिणाम दिसतात. घरातील कोळ्याचे जाळे, धूळ आणि घाण यामुळे अनेक वास्तुदोष निर्माण होतात. अशाच काही वास्तुशास्त्रातील नियमांबद्दल जाणून घेऊयात.

पूजा घर: घरात सुख-शांती, समृद्धी नांदावी, असं प्रत्येकाला वाटतं. मानसिक शांती, सकारात्मकता आणि घरातील लोकांच्या प्रगतीसाठी पूजा घर नेहमी घरातील ईशान्य दिशेला असावे. ईशान्य दिशा ही पूर्व आणि उत्तर दिशेमधील कोपरा आहे. ईशान्य दिशेला देवांचे स्थान आहे. तसेच, पूजा घराच्या वर आणि खाली शिडी, शौचालय किंवा स्वयंपाकघर असू नये हे लक्षात ठेवा.  घरामध्ये खंडित मूर्ती ठेवू नका.  मूर्ती वेळेत पाण्यात विसर्जित करा. अन्यथा नकारात्मक ऊर्जा घरात राहते.

घराचा मुख्य दरवाजा : घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असायला हवा. तसेच दरवाजे चांगल्या स्थितीत असले पाहिजेत. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज होता कामा नये. त्यामुळे बिजागरींना वारंवार तेल घालावं. तसेच दरवाज्याचा रंग उतरू नये.

कापूर : घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर जाळल्याने अनेक वास्तु दोष नष्ट होतात. त्यामुळे हा उपाय रोज करा. यामुळे घरात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येते.

झोपण्याची दिशा: दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नका. असे केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवणे चांगले.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *