Headlines

वर्ध्याच्या डिजिटल विद्यापीठात प्रवेश न घेण्याचे युजीसीकडून आवाहन

[ad_1]

पुणे : राज्यातील वर्धा येथे असलेल्या ‘डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्कील रीसर्जन्स’मध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यार्थ्यांना केले. कायद्यानुसार स्थापना झालेली नसल्याने संबंधित विद्यापीठाला पदवी देण्याचा अधिकार नसून या विद्यापीठात प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असे युजीसीने नोटिशीद्वारे मंगळवारी स्पष्ट केले.

युजीसीने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नोटिशीनुसार युजीसी अधिनियम १९५६चे उल्लंघन करून डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ रीसर्जन्सकडून अभ्यासक्रम राबवले जात हेत. युजीसी अधिनियमातील कलम २२ नुसार केंद्रीय कायदा, प्रोव्हिजन, राज्य कायद्यानुसार स्थापन केलेले विद्यापीठ किंवा कलम तीननुसार स्थापन अभिमत विद्यापीठ विद्यार्थ्यांना पदवी देण्यास पात्र असते. संसदेत पारित केलेल्या कायद्यानुसार स्थापन केलेले विद्यापीठही पदवी देण्यासाठी प्राधिकृत आहे. मात्र डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्कील रीसर्जन्स या पैकी कोणत्याही विभागात समाविष्ट नसल्याचे युजीसीने नमूद केले आहे.

केंद्रीय, प्रोव्हिजनल, राज्य कायद्यानुसार स्थापन झालेल्या संस्थेलाच नावामध्ये विद्यापीठ हा शब्द वापरता येतो. मात्र युजीसी अधिनियमांचे उल्लंघन करून डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ स्कील रीसर्जन्सकडून अभ्यासक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे संबंधित विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे आवाहन युजीसीकडून करण्यात आले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *