Headlines

Urfi Javed: मनुष्याच्या त्वचेपासून उर्फी बनवणार भयानक ड्रेस; आता फक्त एवढचं राहिलय

[ad_1]

Urfi Javed New Outfit : सोशल मीडिया स्टार आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अर्धनग्न आणि अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच  चर्चेत असते. फॅशनच्या नावार उर्फी चित्र विचित्र कपडे घालते. तिच्या कपड्यांमध्ये दिसणारी क्रिएटीव्हीची पाहून लोक थक्क होतात. या कपड्यांमुळे उर्फी नेहमीच ट्रोलरच्या निशाण्यावर असते. त्यातच आता उर्फी कुणी कल्पनाही करुन शकणार अशा वस्तूपासून ड्रेस बनवणार आहे. उर्फीचा नवीन ड्रेस हा  मनुष्याच्या त्वचेपासून तयार झालेला असू शकतो (Urfi Javed New Outfit). 

उर्फीचा प्रत्येक नविन ड्रेस नविन वाद निर्माण करत असतो. उर्फीने लाज सोडली आहे. मात्र, अधिक वाद होऊ नये यामुळे उर्फी फक्त ठरावीक बॉडी पार्ट झाकण्यासाठी कपडे घालत असल्याचा आरोप ट्रोलर करतात. उर्फी वेगवेगळ्या वस्तुंचा वापर करुन फॅशनच्या नावावर वेगवेगळे ड्रेस बनवत असते. 

फॉइल पेपरपासून ते कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पॉलिथिनच्या पिशव्यांपर्यंत, मोटारसायकलची चेन, मनगटावरील घड्याळे, डायमंड ते अगदी मोबाईल पासून देखील उर्फीने ड्रेस बनवले आहेत. फुलांपासून ते शंख, शिंपले देखील उर्फीने सोडले नाहीत. इतकंच काय तर उर्फीने खाण्याच्या कॉटन कँडीपासून देखील ड्रेस बनवला होता. या ड्रेसमध्ये फोटो सेशन करताना उर्फीने ही कॉटन कॅंडी खावून देखील दाखवली होती. 

नुकताच उर्फीने असा विचित्र ड्रेस घातला होता की, एका तरुणीने जॅकेटनं तिचं अंग झाकण्याचा प्रयत्न केला. हा ड्रेस अत्यंत विचित्र होता. उर्फीने ब्लॅक वेलवेट लाँग स्कर्ट घातला होता. या स्कर्टवर उर्फीने एक अशी ब्रा परिधान केली आहे की ज्यामध्ये आइस्क्रीमच्या कोनसारखा आकार वापरण्यात आले होते. या ड्रेस खूपच विचित्र दिसत होता.

यानंतर उर्फीने लाँग जीन्सच टॉप म्हणून घातली. डेनीम जिन्स त्यावर टॉप म्हणून दुसरी ओव्हरसाईज असलेली डेनिम जीन्स उर्फीने घातली होती. या ड्रेसमुळे देखील उर्फी चांगलीच ट्रोल झाली आहे.  हा ओव्हर साईज जीन्स ड्रेस घालून उर्फी फिरत असताना तिने तिच्या नव्या ड्रेसबदद्ल माहिती दिली. सर्व वस्तूंपासून ड्रेस बनवले आहेत. आता ड्रेस बनवण्यासाठी काही वस्तू शिल्लक राहिल्या आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी उर्फीला विचारला असता तिने भयानक उत्तर दिले. 

माणसाची कातडी अजून शिल्लक आहे.  एकाद्या माणसाला मारुन त्याच्या त्वचेपासून ड्रेस बनवला तर किती छान होईल ना असे भयानक उत्तर उर्फीने दिले. यामुळे आता उर्फीला मनुष्याच्या त्वचेपासून ड्रेस बनवण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे उर्फीचा पुढचा ड्रेस हा  मनुष्याच्या त्वचेपासून असू शकतो. 

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *