Headlines

Urfi Javed Pregnant: उर्फी जावेदच्या पोस्टमुळे एकच चर्चा!

[ad_1]

Urfi Javed Pregnant: ‘बिगबॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या बोल्ड फोटोंमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, नुकताच उर्फीचा एक नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, यावेळी उर्फीनं ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. 

उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फीनं बिकीनी परिधान केली आहे. पण यावेळी तिचा हा लूक चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे उर्फीनं तिच्या स्टोरीवर फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शननं वेधले आहे. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत उर्फी म्हणाली की, आज माझ्या Periods चा पहिला दिवस होता आणि त्यामुळे माझे पोट सुटले आहे. ज्यामुळे मी सेमी प्रेग्नंट दिसते. पुढच्या स्टोरीमध्ये उर्फीनं आणखी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत उर्फी म्हणाली, वाढलेल्या पोटामुळे मुलींनी टेन्शन घ्यायला नको पाहिजे. तस पण फ्लॅट स्टमकसारखं काही नसतं. उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, उर्फीनं दिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु होती. दरम्यान, ती प्रेग्नंट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Urfi Javed Pregnant actress bold photo sexy picture

उर्फी जावेद नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. या दरम्यान, पापाराझींनी तिला पठाण संबंधीत काही प्रश्न विचारले आणि त्यासोबतच चित्रपटाला बॉयकॉट करत आहेत त्या लोकांना काय बोलणार? यावर उत्तर देत उर्फी म्हणाली, ‘मला बॅन करा, पण शाहरुख खानचे चित्रपट पाहा.’ त्यानंतर शाहरुख खानसाठी काय सांगशील असं विचारता उत्तर देत उर्फी म्हणाली, ‘शाहरुख खान माझं तुझ्यावर प्रेम आहे. कृपया मला तुझी दुसरी पत्नी बनव.’

हेही वाचा : ‘रोमान्स करत असतानाच म्हणाली भैय्या…’, Kartik Aryan चा अभिनेत्रीसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेत तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. त्यावर ऊर्फीनं कारवाईसाठी चित्रा वाघ यांना खुलं आव्हान (Challenge) दिलं होतं. त्यानंतर त्यांच्यात चांगलाच वाद झाला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *