Headlines

अनोळख्या व्यक्तीवर प्रेम करताय? पहिल्या डेटवर हे ‘8’ प्रश्न विचारायला विसरू नका!

[ad_1]

मुंबई : जीवनात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाल्यानंतर सर्वकाही वेगळं आणि आनंददायी वाटतं. त्या व्यक्तीसोबत तासोंतास रंगलेल्या गप्पा, सतत भेटण्याची इच्छा… असं प्रेमात पडल्यावर होतं. पण प्रेम, आकर्षणाच्या विश्वात एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यापूर्वी तो व्यक्ती कसा आहे? हे कळणं फार महत्त्वाचं असतं. प्रेम संबंधात पहिली डेट ही खूपच खास असते. त्यामुळे पहिल्या भेटीमध्ये, डेटवर जात असाल तर सहाजिकच तुम्ही थोडेफार नर्व्हस असणं स्वभाविक आहे. 

पहिल्या डेटवर नेमके कोणते कोणते प्रश्न विचारावेत? कसे वागावे? याबाबत अनेकजण सल्ले देत असतात. परंतू यावरच तुम्हा दोघांचं रिलेशन पुढे जाईल की नाही याचं भवितव्य ठरतं.  म्हणूनच तुमच्या मनातील सारा गोंधळ दूर करण्यासाठी हा सल्ला नक्की जाणून घ्या.  

 पहिल्या डेटवर हे 8 प्रश्न तुम्ही बिनधास्त विचारू शकता –  
1. तुमची स्वप्न काय ?   

तुमचा साथीदार काय काम करतो याबाबत तुम्हांला पुसटशी कल्पना नक्की असेल पण त्याची भविष्यातील स्वप्न काय आहेत ? हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. करियर आणि संसार यांचा ताळमेळ साधण्यासाठी तुम्हांला भविष्यात काय करायचं आहे? कशाबाबत तडजोड करावी लागेल याचा तुम्हांला अंदाज येईल.  

2. आवडती पुस्तकं आणि चित्रपट
दिवस कसा होता? आवडता छंद कोणता ? असे नेहमीचे प्रश विचारण्यापेक्षा तुमच्या आवडीनुसार पुस्तकं किंवा सिनेमा कोणता पहता ? हे विचारा  म्हणजे तुम्हांला त्याच्या आवडीनिवडीबाबत अंदाज येईल. सोबतच तुमची आवड पटली तर त्यावर बोलायला पुढील विषय आपोआपच खुले होतील.  

3. पॅशन कशाचं ?
पोटापाण्यासाठी किंवा कुटुंबाच्या दबावामुळे काही जणांना विशिष्ट नोकरी करावी लागते. परंतू पॅशन ही गोष्ट प्रत्येकाला जगण्यासाठी खास कारण देते. त्यामुळे तुमचा साथीदार कशाबाबत पॅशनेट आहे हे जाणून घ्या. 

4. पालकांशी, भावंडाशी खूप जवळीक आहे का? 
लग्नानंतर दोघांचंही आयुष्य झपाट्याने बदलतं. त्यामुळे त्यांच्या साथीदाराच्या आयुष्यात असलेल्या व्यक्तींसह त्यांचा स्वीकार करावा लागतो. मुलींना त्यांचा नवरा ‘मम्माज बॉय’ भेटल्यास तिला त्या दोघांनाही एका वेगळ्या पातळीवर समजून घेणं गरजेचे ठरू शकतं. तसेच जर मुलीच्या घरातही सिंगल पॅरेन्ट असेल तर लग्नानंतरही तिच्या कुटुंबीयांना वेळ देणं गरजेचं आहे हे मुलाला समजून घ्यावे लागेल. त्यासाठी सुरूवातीलाच मोकळेपणाने बोलणं सोयीस्कर ठरते. 

5. शालेय जीवन समजून घ्या
तुमचा साथीदार शालेय जीवनात कसा होता हे नक्की जाणून घ्या. शाळेत तो / ती खूप अ‍ॅक्टीव्ह होती का ? खूपच हुशार आणि पुस्तकी किडा होती का ? हे नक्की जाणून घ्या. त्याकाळात मित्र बनवायला काही त्रास होता का ? 

6. मित्र मंडळी कसे होते ?  
तुमच्या साथीदाराचे मित्रमंडळ कसे आहे ? हे  नक्की जाणून घ्या. लग्नानंतर जसे दोघांना कुटुंबीयांसोबत जुळवून घ्यावे लागते तसेच तुम्हांला साथीदाराच्या मित्रमंडळासोबतही जुळवून घ्यावे लागेल. 

7. कोणत्या गोष्टीचा तिटकारा आहे ? 
तुमच्या साथीदाराला कोणत्या गोष्टीबाबत प्रेम, आकर्षण, पॅशन आहे? हे तुम्हांला ठाऊक असणं आवश्यक आहे. पण त्यासोबतच तुम्हांला त्याला कोणत्या गोष्टीचा राग येतो हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.  

8. बिल शेअर करायला विसरू नका 
साथीदारासोबत बिल शेअर करायला मूळीच विसरू नका. कारण बिल शेअर करणं म्हणजे तुम्ही भविष्यात पुन्हा एकमेकांना भेटू शकता. तुम्ही त्याच्या सोबत आहात हे दाखवण्याचा एक संकेत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *