Headlines

‘अ‍ॅनिमल’मध्ये बॉबी देओल आणि रणबीरचा किंसिंग सीन; ओटीटीवर पाहायला मिळणार अनकट व्हर्जन

[ad_1]

मुंबई : संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ सध्या सगळीकडे चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. या सिनेमातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या अभिनयासोबतच या सिनेमातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. या सिनेमात खूप सारे एक्शन, ईमोशन्स आणि इंटीमेट सीन्स आहेत. 

या सिनेमाची क्रेझ सध्या ऑडियन्समध्ये खूप आहे. या चित्रपटातील काही सीन्स कट करुन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असला तरी या सिनेमात  रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा किसींग सीनही कट करण्यात आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हा सिनेमा ओटीटीवर अनकट रिलीज होणार आहे. 

‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर बॉबीचा होता किसींग सीन
‘अ‍ॅनिमल’ या सिनेमावर प्रेक्षक खूप प्रेम करत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालतोय. या सिनेमातील रणबीरच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. याचप्रमाणे बॉबी देओलचेही खूप कौतुक होत आहे. या सिनेमात बॉबीने एकही शब्द नं उच्चारता केवळ आपल्या एक्सप्रेशनने त्याच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. सिनेमात बॉबी आणि रणबीरचा एक किसींग सीनदेखील आहे. मात्र संदीप रेड्डी वांगाने थिएटरमध्ये रिलीसमधून हा सीन हटवला आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार डिलीट केलेला हा किसींग सीन ओटीटी वर्जनचा एक हिस्सा असेल. 

समोर आलेल्या माहितीनुसार, द क्विंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉबी देओलने खुलासा केला आहे की, ”हे दोन भाऊ आहेत,ज्यांना एकमेकांना मारायचं आहे, पण त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. हा क्लायमॅक्स सीक्वेन्स आहे. बॅकग्राउंडला एक गाणं वाजतंय, जे प्रेमाविषयी आहे.” बॉबीने पुढे खुलासा केला की, त्याचा रणबीर कपूरसोबत एक किसिंग सीन आहे, मात्र हा सीन थिएटर रिलीजमध्ये कट केला गेला आहे. मात्र हा सीन कदाचित नेटफ्लिक्स रिलीजचा एक भाग असेल. बॉबी पुढे म्हणाला,”‘तुम्ही भांडत आहात, आणि अचानक तुम्ही त्याला किस करता आणि मग तुम्ही हार नाही मानत आणि तो तुम्हाला मारु लागतो. मात्र हा किसींग सीन काढून टाकण्यात आला आहे. मात्र मला वाटतं की,  हा अनकट सीन नेटफ्लिक्स वर्जवर येऊ शकतो.”

‘अ‍ॅनिमल’ ओटीटीवर केव्हा रिलीज होणार
‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा ओटीटीवर अनकट वर्जनमध्ये रिलीज होण्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पहायला मिळत आहे. पुढच्या महिन्यात 14 किंवा 15 जानेवारीला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर ‘Animal’ रिलीज होणार असल्याच्या बातम्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *