Headlines

उमेश कामतने का केली ‘मायलेक’ची निवड?

[ad_1]

Umesh Kamat Mylek : आई आणि मुलीच्या सुरेख नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील गाणी, ट्रेलर सोनाली आणि सनायाची सुंदर केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच यात विशेष लक्ष वेधून घेत आहे तो उमेश कामत. उमेशची या चित्रपटात एकंदरच कूल आणि इंटरेस्टिंग भूमिका असल्याचं दिसतंय. खरंतर, हा चित्रपट आई आणि मुलीवर बेतलेला असतानाही उमेशनं ही भूमिका का स्वीकारली याचा खुलासा त्यानं स्वतःच केला आहे. 

याबद्दल उमेश कामत म्हणतो, ”ज्यावेळी सोनालीनं मला या चित्रपटासाठी फोन केला, त्यावेळीच तिनं मला भूमिका काय असणार याची पूर्वकल्पना दिली आणि ही भूमिका तू करणार का विचारले आणि यावर माझे उत्तर हो होते. मला ही कथाच मुळात इतकी आवडली की माझ्या भूमिकेची लांबी किती आहे, हे माझ्यासाठी त्यावेळी महत्वाचं नव्हतंच. मी विषयाला प्राधान्य दिलं. या नात्याचा मी नेहमीच आदर करतो. खूप सुंदर असं हे नातं आहे. प्रिया आणि तिच्या आईचं नातं मी जवळून अनुभवलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मी सोनाली आणि सनायाचंही नातं मला अनुभवता आलं. इंडस्ट्रीमध्येही अशा अनेक ‘मायलेकी’ आहेत, ज्यांचं नातं खूपच सुंदर आहे. हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर येतोय, खूप भारी आहे, म्हणून हा चित्रपट मी केला.” 

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आईमुलीचे स्ट्राँग बाँडिंग दिसत असतानाच त्यांच्या या सुंदर नात्यात दुरावा येत असल्याचेही दिसले होते. आता हा दुरावा का येतोय, यात उमेशची भूमिका काय? या ‘मायलेक’ पुन्हा एकत्र येणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहून आपल्याला नक्कीच मिळणार आहेत.

हेही वाचा : सलमान घरावर गोळी झाडणाऱ्याच्या बहिणीचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘एनकाऊंटर करण्याची…’

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटाची सोनाली आनंद निर्माती असून या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर आणि संजय मोने या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कल्पिता खरे, बिजय आनंद  सहनिर्मिती या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. हा चित्रपट येत्या 19 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सोनाली खरे आणि सनाया आनंद या रिअल ‘मायलेकी’ प्रेक्षकांना रिलमध्ये पाहायला मिळणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *