Headlines

“माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते,” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप | Shivsena Uddhav Thackeray BJP Devendra Fadanvis Eknath Shinde sgy 87

[ad_1]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ज्या लोकांनी आणि पक्षाने ठाकरे कुटुंबावर विकृत भाषेत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात अशा शब्दांत सुनावलं. तसंच तुमचं ठाकरे कुटुंबावरील प्रेम खरं आहे का? अशी विचारणा केली. महत्वाचं म्हणजे माझ्या मुलांना आयुष्यातून उठवण्यापर्यंत प्रयत्न चालले होते असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“या लोकांनी मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्यबद्दल प्रेम आहे याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानत आहे. आजदेखील तिकडे गेल्यानंतरही आमच्याबद्दल प्रेम वाटत आहे याबद्दल धन्य झालो. पण हेच प्रेम गेली अडीच वर्ष जी लोक, पक्ष याच घरावर, कुटुंबीयांवर अश्लाघ्य आणि विकृत भाषेत टीका करत होती, तेव्हा कोणाचीही दातखीळ उचकटली नव्हती. यांच्यापैकी एकानेही त्याला विरोध केला नव्हता”, असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास परत जाऊ म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले “सूरतेला जाण्यापेक्षा…”

“ज्यांनी ही सगळी विकृत भाषा वापरली, अडचणी निर्माण केल्या तसंच विकृत भाषा वापरत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

“जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…”, दीपक केसरकर यांचं मोठं विधान

“ज्यांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला, माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून बसत आहात, त्यांच्याकडून स्वागत स्वीकारत आहात, मग हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या,” असंही ते म्हणाले.

मातोश्रीवर परत येऊ म्हणणाऱ्यांनाही उत्तर –

“इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *