Headlines

राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत उद्धव ठाकरेंच्या भाकीतावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया, म्हणाले…|Ashish Shelars reaction on Uddhav Thackerays prediction regarding midterm elections in the state msr 87

[ad_1]

महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व घरोघरी जावे, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (शनिवार) दिला. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंच्या या भाकीतामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. तर ठाकरेंच्या या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार म्हणाले, “मला वाटतं उद्धव ठाकरे यांना त्याशिवाय पर्याय काय आहे. स्वत:च्या गेलेल्या लोकांच्या आरोपवर उद्धव ठाकरे कधी बोलले आहेत का? स्वत:च्या पक्षाचे मंत्री, आमदार, सदस्य गेले कधी तर सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे होत्या, तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळी गेले. मतदानही त्यांनी विरोधात केलं, त्या आधी तुमच्याशी बोलले सुद्धा आणि त्यांचा आरोप काय आहे? मूळ प्रश्नापासून भटकवलं जात आहे. त्यांचा आरोप बाळासाहेबांचे विचार संपवले जात आहेत, शिवसेना दुबळी केली जात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याशी राजकारण करत आहे या प्रश्नांना बगल द्यायची आणि भावनात्मक मुद्य्यांवर उरलेल्या शिवसैनिकांना टिकणवण्यासाठी गद्दारीचं गाजर द्यायचं, राजकारण म्हणून बरोबर आहे. तसंच राहिलेले जे आहेत त्यांना कधीतरी हे सांगायचं, की उद्या आपण एकनाथ शिंदेबरोबर येऊ आणि भाजपाही येऊ शकतं तुम्ही आता जाऊ नका. मुंबईतील खासदाराच्या सुपुत्राला सांगितलं जातय. जाणारा व्यक्ती त्यांना बोलून जातोय की उद्धव ठाकरे तुमचं चुकतय.” एबीपी माझा कट्ट्यावर शेलार बोलत होते.

याचबरोबर “अखिल हिंदुस्थानात एकमेव नेता आणि एकमेव पक्ष असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेना जे कधीच चुकत नाही. त्यांचे निर्णय कधीच प्रश्नांकीत नसतात, सगळं योग्य असतं इतक्या अहंकारातील एकमेव पक्ष आणि एकमेव पक्ष नेता ते आहेत.” असं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला आणि “हे सरकार १०० टक्के उर्वरीत अडीच वर्ष पूर्ण करणार आहे आणि यापुढे आम्ही येणार आहोत.” असंही सांगितलं.

राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठय़ा घोषणा करायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्येही त्यांनी मोठे प्रकल्प व गुंतवणुकीच्या घोषणा केल्या व निवडणुका जाहीर झाल्या. राज्यातील सरकारमध्ये अस्थिरता असून काही आमदार नाराज असून फुटण्याचा विचार करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही काळाने अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांची शक्यता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आणि आपले सरकार असताना केलेली कामगिरी घरोघरी पोचविण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना ठाकरे यांनी केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *