Headlines

उद्धव ठाकरेंची तोफ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार; म्हणाले, “तुम्ही सभा लावा, मी…” | uddhav thackeray meeting in cm eknath shinde thane ssa 97

[ad_1]

माझी भूमिका शिक्षकासारखी झाली आहे. कारण विद्यार्थी बदलत आहेत, पण शिक्षक एकच आहे, आणि बोलायचे तेच असते. शिवसेना संपवायला निघालेल्यांना कल्पना नव्हती, की ज्या ज्या वेळी शिवसेनेवर आघात झाले, तेव्हा ती दसपटीने नाहीतर शतपटीने मोठी झाली आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

माजी मंत्री संजय देशमुख आणि ठाण्याचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दोघांनी शिवबंधन बांधलं आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

हेही वाचा : “एक साधा फोटोग्राफर एवढी संपत्ती…”, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर कडवट शब्दांत टीका; म्हणाले…

“ठाण्यातील सर्व चिडीचूप झाले आहेत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व चिडीने पेठून उठले आहेत. माझ्या हातात काही नसले तरी, माझ्या हाताला ताकद देण्याचे काम तुम्ही करत आहात. तुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलो असे समजा,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट; धनंजय मुंडे म्हणाले, “कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं…”

कोण आहेत संजय देशमुख?

संजय देशमुख हे माजी शिवसैनिक आहेत. यवतमाळच्या दिग्रस मतदासंघातून १९९९ आणि २००४ साली ते अपक्ष विधानसभेवर निवडून गेले होते. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय राठोड यांच्याविरोधात देशमुख यांना ७३ हजार मते मिळाली होती. देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे संजय राठोडांविरोधात शिवसेनेने तगडे आव्हान उभे केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *