Headlines

“कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना खुर्चीवर खाली खेचायचं आणि…”, भुमरेंचे देशमुखांवर गंभीर आरोप | Sandeepan Bhumare allegations on MLA Prakash Deshmukh Uddhav Thackeray

[ad_1]

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर सुरतला जातानाचा किस्सा सांगितला आहे. तसेच बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी माझ्यासमोर एकनाथ शिंदे यांना सांगितलं, “मी देशमुख आहे, देशमुख कधी शब्द फिरवत नाही. आपल्याला कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना या खुर्चीवरून खाली खेचायचं आहे.” ते शनिवारी (२४ सप्टेंबर) अकोल्यात शिंदे गटाने आयोजित केलेल्या हिंदूगर्वगर्जना मेळाव्यात बोलत होते.

संदीपान भुमरे म्हणाले, मी कॅबिनेट मंत्री असताना एकनाथ शिंदेंसोबत गेलो. असं कधी घडत नाही, पण आम्ही कॅबिनेट मंत्री असो की राज्यमंत्री असो एकनाथ शिंदेंसोबत गेलो. ही देशातील पहिली घटना आहे. मुंबईतून सुरतला जाताना मी एकनाथ शिंदेंसोबत होतो. अब्दुल सत्तार आणि नितीन देशमुखही आमच्या सोबत होते. ठाण्याहून सुरतला जाताना आम्ही गाडीत बोलत होतो.”

“कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना या खुर्चीवरून खाली खेचायचं आणि…”

“तेव्हा अकोल्यातील आमदार नितीन देशमुख माझ्यासमोर एकनाथ शिंदेंना म्हणाले की, साहेब मी देशमुख आहे. देशमुख कधी शब्द फिरवत नाही. तुम्ही निर्णय घ्या, मी तुमच्या पाठिशी आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थिती उद्धव ठाकरेंना या खुर्चीवरून खाली खेचायचं आहे आणि एकनाथ शिंदेंना खुर्चीवर बसवायचं आहे. ते हे बोलल्याचा मी स्वतः साक्षीदार आहे,” असं संदीपान भुमरे यांनी सांगितलं.

“त्याचे मी आणि अब्दुल सत्तार साक्षीदार”

“आम्ही सुरतला गेल्यावर हॉटेलमध्ये थांबलो. त्यावेळी काय झालं मला सांगता येत नाही, पण नितीन देशमुखांचा निर्णय बदलला. त्याचे मी आणि अब्दुल सत्तार साक्षीदार आहोत. नितीन देशमुखांनी लोकांना सांगितलं की, मी गुवाहाटीवरून कसा आलो, एका ट्रकवाल्याने मला आणलं असं सांगितलं. आम्ही हे सर्व टेलिव्हिजनवर पाहिलं. मात्र, एकनाथ शिंदेंनी त्यांना स्वतः खासगी विमान करून दिलं.”

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे? वाचा…

“तेव्हा मी एकनाथ शिंदेंसोबत होतो. त्यांनी दोन माणसं देशमुखांसोबत पाठवली. तेव्हा देशमुख म्हटले की, मी घरी जाऊन एकदा घरच्यांना भेटून येतो,” असंही भुमरेंनी नमूद केलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *