Headlines

​WhatsApp Tricks : तुम्हाला व्हॉट्सॲपवर कोणी ब्लॉक केलंय का? या सोप्या ट्रिकने लगेच कळेल…

[ad_1]

​WhatsApp वर ब्लॉक केल्यावर काय होते?

whatsapp-

जर आपण कोणाला WhatsApp वर ब्लॉक केलं किंवा कोणी आपल्याला ब्लॉक केलं तर दोन्ही कॉन्टॅक्ट एकमेंकांना मेसेज पाठवू शकणार नाहीत. तसंच कॉलिंग, स्टेटस शेअरिंग यापैकी काहीही होणार नाही. तसंच ज्या व्यक्तीने समोरच्याला ब्लॉक केलं आहे, तो त्या व्यक्तीचा प्रोफाईल फोटो किंवा डीपी पाहू शकणार नाही. त्या व्यक्तीचे ऑनलाइन स्टेटस किंवा ब्लू टिक दिसणार नाही.

वाचा : Video Editing Apps: रिल्स, स्टोरी बनवण्यासाठी सोपे व्हिडीओ एडिटिंगॲप्सशोधताय? ‘हे’ आहेत टॉप ५ ॲप्स​

​WhatsApp वर कोणी ब्लॉक केले आहे हे कसे कळेल?

whatsapp-

जर तुमचा मित्र किंवा कोणीही तुम्हाला ब्लॉक केलं आहे, असा संशय आला तर तुम्हाला आधी त्याची ऑनलाइन स्थिती आणि लास्ट सीन चेक करावे लागेल. हेे दोन्ही तुम्हाला आधी दिसत असेल आणि नंतर नाही तर कदाचीत तुम्ही ब्लॉक झाले आहेत.पण हो याचा अर्थ असा नाही की त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे याची १००% गॅरंटी नाही, कदाचित त्या व्यक्तीने हे दोन्ही पर्याय त्याच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये लपवले असतील. तसंच मेसेज सेंड झाल्यावर डबल टिक्स आणि ब्लू टिक्स दिसतच नसतील, तर समजा त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलले आहे. पण तरीही कन्फर्म होत नसेल कारण समोरच्याने प्रायव्हसीमध्ये जाऊन डबल टिक किंवा ब्लू टिक hide केलेले असू शकते. सेंडकेलेला मेसेज जर पोहोचत नसेल किंवा समोरच्याला तुम्हीएकाध्या ग्रुपमध्ये अॅड करु शकत नसाल तर समजा तुम्हाला ब्लॉक केलं आहे.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​WhatsApp वर ब्लॉक नंबर कसा पाहायचा?​

whatsapp-

आपल्याला कधीकधी एखाद्याला WhatsApp वर ब्लॉक करावे लागते, अशा परिस्थितीत गरज पडल्यास अनब्लॉकही करावे लागते. म्हणूनच कोणता नंबर ब्लॉक केला आहे हे प्रथम जाणून घेतले पाहिजे. ब्लॉक नंबर शोधण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या Whatsapp च्या सेटिंगमध्ये जा.
यानंतर अकाऊंटच्या ऑप्शनवर जा आणि प्रायव्हसीच्या ऑप्शनवर जा आणि इथे तुम्हाला Blocked Contacts चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व ब्लॉक केलेले संपर्क पाहायला मिळतील. जर तुम्हाला ते अनब्लॉक करायचे असतील तर त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा आणि अनब्लॉकच्या पर्यायावर क्लिक करा. असे केल्याने तुमचा नंबर अनब्लॉक होईल.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

​WhatsApp वर स्वतःला अनब्लॉक कसं करु शकता?

whatsapp-

जर कोणी आम्हाला WhatsApp वर ब्लॉक केले, तर बरेच लोक अनब्लॉक कसे करायचे याचा शोध घेत असतात. पण तुम्ही फक्त समोरच्या व्यक्तीला अनब्लॉक करण्याची विनंती करु शकता. त्याच्याच हातात आहे, तुम्हाला अनब्लॉक करणं, तुम्ही स्वत:ला अनब्लॉक करु शकणार नाही.

​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

ऑनलाईन स्टेटस लपवण्याचं फीचर कसं वापराल?

ऑनलाईन स्टेटस लपवण्याचं फीचर कसं वापराल?

ऑनलाइन स्टेटस लपवण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. आता येथून प्रायव्हसी ऑप्शनमध्ये, तुम्हाला सर्वात वरती शेवटचा Seen आणि Online हा पर्याय दिसेल. या फीचरमध्ये युजरला प्रायव्हसीसाठी दोन पर्याय दिलेले आहेत, एका ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्सना दाखवू शकता, तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुमचे ऑनलाइन स्टेटस सर्व कॉन्टॅक्ट्ससाठी लपवले जाईल. या फीचरच्या मदतीने, तुमचं ऑनलाइन स्टेटस कोण पाहणार हे तुम्ही स्वत: ठरवू शकाल, म्हणजेच तुम्ही इच्छेनुसार तुमची ऑनलाइन स्थिती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळी करू शकता. हे फीचर्स व्हॉट्सअॅपच्या स्टेटस फीचरप्रमाणे काम करतात, ज्यामध्ये यूजरला Who Can See चा पर्याय मिळतो.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *