Headlines

त्यांच्यापासून दूर राहा…; बिग बींना कोणापासून आहे धोका?

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडचे ‘शेहनशाह’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकताच त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा केला. अमिताभ हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चं (Kaun Banega Crorepati) सुत्रसंचालन करत आहेत. यावेळी ते चाहत्यांसोबत खूप गप्पा मारताना दिसतात. दरम्यान, या वेळी हॉटसीटवर बसलेल्या एका स्पर्धकानं अमिताभ यांना चाहत्यांशी भेटू नका असा सल्ला दिला आहे. 

हेही वाचा : मनाचा मोठेपणा दाखवत सुपरस्टार बाप- लेकानं परत केलं कोट्यवधींचं मानधन, कारण पटण्याजोगं…

‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या (Kaun Banega Crorepati 14) शेवटच्या एपिसोडमध्ये, जेव्हा अमिताभ बच्चन यांनी पहिली स्पर्धक निघून गेल्यानंतर दुसऱ्यांदा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळ खेळला तेव्हा शांभवी बंदलला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. ती मूळची ठाणे, मुंबईची असून एका मल्टी नॅशनल कंपनीत कंटेंट स्पेशालिस्ट म्हणून काम करत आहे.

हेही वाचा : डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे गावंढळ म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

आता ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या स्पर्धकानं बिग बीं समोर बसल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याबद्दल सांगितले. अमिताभ यांनी त्यांना गमतीनं विचारलं ‘व्हायरस लोकांना निवडतो का?’ यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘व्हायरस होत नाही. तुम्ही कोठूनही घरी आल्यावर स्वत:ची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे.’

हेही वाचा : ‘मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं…’, रितेश देशमुखच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे एकच खळबळ

शांभवी म्हणाली, ‘सर, मी फक्त एवढंच सांगतेय की तुम्हाला इथे प्रेक्षक भेटतील, जर एखाद्याला संसर्ग झाला असेल तर तुम्हालाही होऊ शकतो.’ तेव्हा बिग बी म्हणाले, ‘मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या प्रेक्षकांमुळे मी आजारी पडलो तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन.’ (Kaun Banega Crorepati 14 Amitabh Bachchan Says If I Fell Ill Because Of My Audience I Would Consider Myself To Be Lucky )

अमिताभ पुढे म्हणाले, ‘मला कधीच वाईट वाटलं नाही की माझ्या प्रेक्षकांमुळे मी आजारी पडलो किंवा मला संसर्ग झाला. मला त्याला भेटण्याची संधी आहे. त्यांना हात मिळवण्यासाठी अजिबात संकोच वाटत नाही. तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *