Headlines

त्या चिमुकलीसाठी ती पुन्हा धावून आली, मुलीची अवस्था पाहून सुष्मिताच्या डोळ्यात पाणी

[ad_1]

Sushmita Sen Interview : बॉलीवूड स्टार सुष्मिता सेन ही नेहमी तिच्या बोल्ड आणि सुंदरतेसाठी ओळखली जाते. सुष्मिता ही दत्तक आणि पालकत्वाबद्दल बोलण्यास कायम पुढेच असते. रेनी आणि अलिसा या दोन मुलींना दत्तक घेणाऱ्या या अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगितला, ज्यावेळी तिच्या मातृत्वाने म्हणजेच मदर इन्स्टिंक्टने आपल्या मोठ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मदत केली होती.

रेनीवर कोणतं संकट?

सुष्मिताने ट्विंकल खन्नाला ट्वीक इंडियासाठी एक मुलाखत दिली. यात तिने सांगितलं की, प्रत्येकजण त्याला मुलाचे संगोपन कसं करायचं याबद्दल बोलत होती. रेनाला दत्तक घेतल्यानंतर तिने आपला अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला.

सुष्मिता म्हणाली की एकदा रेनी रडताना मोठ्याने ओरडत सुद्धा होती. त्यावेळी सुष्मिताची आई म्हणाली होती की, तू ओव्हर रिअ‍ॅक्ट करतीयेस, रेनी लहान आहे, मुलांसोबत असं होतच असतं, थंडी वाजते, मुल किंचाळतं. यावर सुष्मिताने तिच्या आईला सांगितलं की, तू प्रत्येक वेळी असं बोलू शकत नाही, मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. सुष्मिताला तेव्हा शूटसाठी जायचं होतं. सुष्मिता कामासाठी बाहेर असायची तेव्हा तिची आई रेनीची काळजी घ्यायची.

अनेक आठवडे रुग्णालयात दाखल करावं लागलं

सुष्मिताने सांगितलं की, ती परत आल्यावर रेनीच्या पाळण्याजवळ गेली आणि तिच्या नाकाशी खेळू लागली. रेनीने डोळे उघडले आणि मग ती ओरडू लागली लागली. मी तिला उचललं आणि त्यावेळी रेनीच्या पाठीला काहीतरी जाणवलं.

मी माझ्या नाईट सूटमध्ये होतो पण मी गाडीची चावी उचलली आणि तिला एकटीने नानावटी हॉस्पिटलत नेलं. तिला आयसीयूमध्ये दाखल केलं. माझी मुलगी त्या रात्री मेली असती. ही फक्त आईची प्रवृत्ती आहे की मी तिला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये आणलं.

रेनीची अवस्था पाहून माझा जीव अगदी कासावीस झाला होता. रेनीच्या छातीत पाणी झाल्याचं समजलं. तिची प्रकृती खूप नाजूक होती. तिला अडीच आठवडे रुग्णालयात उपचारासाठी राहावं लागलं.

सुष्मिताने असंही सांगितलं की रेनी दत्तक घेण्यासाठी फिट नव्हती. कारण, तिच्या फुफ्फुसात पाणी होत आणि तिची वाढ तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तीन महिन्यांनी कमी होती. असं असतानाही तिने रेनीला दत्तक घेतलं. रेनीला दत्तक घेताना आणि नंतर तिला मृत्यूपासून वाचवताना सुष्मिता देवासारखी धावून आली.

रेनीने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली

सुष्मिता सेन दोन मुलींची आई असली तरी ती अजूनही अविवाहित आहे. सुष्मिताने रेनी आणि अलिशाला दत्तक घेतलेल आहे. सुष्मिताचं या दोघांसोबत खूप चांगलं बॉन्डिंग आहे. सुष्मिता जगात कुठेही असली तरी आपल्या मुलींना वेळ द्यायला विसरत नाही. आईप्रमाणेच रेनेलाही अभिनयाच्या जगात आपलं नाव कमवायचं आहे आणि तिने ते सुरूही केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *