Headlines

Twinkle Khanna च्या सासूने जेव्हा ‘या’ व्यक्तीला न्यूड पाहिलं

[ad_1]

मुंबई : ‘मेला’, ‘जान’,’बरसात’ अशा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आद अभिनयापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, ट्विंकल तिच्या युट्यूब चॅनेलमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिच्या चॅनलवर ती अनेक सेलिबिर्टींची मुलाखत घेताना दिसते. कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी ट्विंकल आज सासू अरुणा भाटिया (Twinkle Khanna mother-in-law) मुळे चर्चेत आली आहे. 

ट्विंकलच्या सासू आणि अभिनेता अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांनी त्यांच्या एका नातेवाईकाला न्यूड पाहिलं होतं. ‘त्या’ व्यक्तीला न्यूड पाहिल्यानंतर  ट्विंकलच्या सासूचा उडाला गोंधळ होता. आजही ट्विंकलला तिच्या सासूची ही गोष्ट लक्षात आहे. 

या गोष्टीचा खुलासा खुद्द ट्विंकलने केला. अभिनेत्री म्हणाली, ‘काही वर्षांपूर्वी पोम्मी आत्या…. जी आजही व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलमधील फरक समजू शकत नाही. त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडला आणि 72 वर्षीय पतीला फोन दिला. जे टॉवेल घेण्यासाठी जात होते.’

ट्विंकल पुढे म्हणाली, ‘अत्या काकांना म्हणाली, मोहनजी फोन घ्या दीदीने तुम्हला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला आहे. तेव्हा काकांना न्यूड पाहून माझ्या सासूने फोन कट केला… ‘  ट्विंकलने हा किस्सा सांगितल्यानंतर अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या. 

सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी अक्षय कुमारच्या आईचं निधन झालं आहे. आईच्या निधनाची बातमी खुद्द अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. शिवाय अक्षयने आईसाठी एक भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. ‘ती माझ्यासाठी सर्व काही होती. आज मी मोठ्या दुःखात आहे. माझी आई अरूणा भाटीया यांचं निधन झालं आहे….’ असं लिहित अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *