Headlines

Tulsi Vivah : तुळशी विवाहानंतर हे काम केल्यास लक्ष्मी होते प्रसन्न, तुमच्या इच्छा होतात पूर्ण

[ad_1]

Tulsi Mantra Jaap:दिवाळी झाली की तुळशी विवाहाची लगबग सुरु होती. यावेळी तुळशी विवाह शनिवार 5 तारखेला आहे. तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला केला जातो. पंचांगानुसार यंदा तुळशी विवाह 5 नोव्हेंबरला होणार आहे. यावेळी देवउठनी एकादशी 4 नोव्हेंबरला आणि तुळशीविवाह 5 नोव्हेंबरला होणार आहे. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे आराध्य दैवत शालिग्रामशी होतो. शास्त्रानुसार या दिवशी तुळशी विवाह केल्यास कन्यादान केल्याप्रमाणे फळ मिळते. 

हिंदू धर्मात तुळशीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. यासोबतच लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो. असे मानले जाते की तुळशीची पूजा करणे खूप लाभदायक मानले जाते. तुमच्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न होऊन माता तुळशी तुम्हाला अखंड सौभाग्याचे वरदान देते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुळसी विवाहाची पूजा केल्यानंतर केवळ तुळशीची आरती आणि मंत्र जप केल्यास पूर्ण फळ प्राप्त होते. आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देते. 

तुळशी माताचा स्तुती मंत्र

देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चितासि मुनीश्वरैः,
नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये।। 

माता तुळशी पूजा मंत्र

तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।  

तुळसी मातेची आरती

जय जय तुलसी माता
सब जग की सुख दाता, वर दाता
जय जय तुलसी माता ।।

सब योगों के ऊपर, सब रोगों के ऊपर
रुज से रक्षा करके भव त्राता
जय जय तुलसी माता।।

बटु पुत्री हे श्यामा, सुर बल्ली हे ग्राम्या
विष्णु प्रिये जो तुमको सेवे, सो नर तर जाता
जय जय तुलसी माता ।।

हरि के शीश विराजत, त्रिभुवन से हो वन्दित
पतित जनो की तारिणी विख्याता
जय जय तुलसी माता ।।

लेकर जन्म विजन में, आई दिव्य भवन में
मानवलोक तुम्ही से सुख संपति पाता
जय जय तुलसी माता ।।

हरि को तुम अति प्यारी, श्यामवरण तुम्हारी
प्रेम अजब हैं उनका तुमसे कैसा नाता
जय जय तुलसी माता ।।

तुळसी मातेचा ध्यान मंत्र 

तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।  

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *