Headlines

‘तुला लाज वाटत नाही का?’, 4 वर्षाच्या मुलासमोर बिकिनी घातल्याने छावी मित्तल ट्रोल, अभिनेत्रीने दिलं उत्तर

[ad_1]

Chhavi Mittal Trolled: अभिनेत्री आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर छावी मित्तल अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. यादरम्यान, तिने पोस्ट केलेला एक फोटो सध्या चर्चेत आहे. छावी मित्तलने (Chhavi Mittal) इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या मुलासह एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत छावी मित्तलने बिकिनी घातलेली आहे. यानंतर या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिला ट्रोल केलं असून प्रसिद्धीसाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अभिनेत्रीने कमेंटमध्ये हे करण्यामागील कारण सांगितलं आहे.

छावी मित्तलने शेअर केला बिकिनीमधील फोटो

छावी मित्तल सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांचा सांभाळ कसा करावा यावर सध्याच्या पालकांची पिढी कसा विचार करते यासंबंधी आपली मतं मांडत असते. त्यातच तिने आता आपला चार वर्षांचा मुलगा अरहामसह एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या मुलीने काढलेला आहे. फोटोत छावी मित्तलने बिकिनी घातल्याचं दिसत आहे. 

हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “हा गोड फोटोबॉम्बर माझ्यापासून दूर जाण्यास नकार देत आहे. यामुळे अलिबागची ही ट्रीप फार मजेशीर होत आहे. छोटी अरिजादेखील छान फोटो काढत आहे ना?”. 

7 जुलैला छावी मित्तलने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. फोटोतून छावी मित्तलने आपल्या अलिबाग ट्रीपमधील काही आठवणी शेअर केल्या आहेत. पण छावी मित्तलने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. काहींनी तिच्यावर टीका केली असून, काहींनी ती ज्याप्रकारे मुलांना वाढवत आहे त्याचं कौतुक केलं आहे. 

काही नेटकऱ्यांनी छावी मित्तलवर टीका करताना लज्जास्पद असं म्हटलं आहे. आपल्या मुलासमोर काय कपडे घालावेत याचं भान असावं असं त्यांनी म्हटलं आहे. तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे. यावेळी छावी मित्तलनेही एका चाहत्याच्या कमेंटवर उत्तर देताना सांगितलं की, “मुलांना वाढवताना सर्व काही सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे”

छावी मित्तलवर टीका आणि कौतुक

एका युजरने कमेंट करताना म्हटलं आहे की, “हे सर्व काही सोशल मीडियासाठी आहे. हे सर्व लोकप्रियता आणि बनावट सुसंस्कृतपणासाठी होत आहे. महिलांना छोट्या कपड्यात स्वीकारणं याचा अर्थ त्यांचा आदर करतो असा होत नाही. पाश्चिमात्य संस्कृती अद्यापही आपल्यावर राज्य करत असून, असे लोक गुलाम आहेत”.

दरम्यान एकाने कमेंट केली आहे की, “तू नेहमीप्रमाणे छान दिसत आहे. कोणत्याही गोष्टीवर निर्णायक न होण्याचं चांगलं उदाहरण मुलांना देत आहेत. मुलगा जेव्हा याच वयापासून आईला आदर देण्यास शिकतो, तेव्हा तो इतर महिलांनाही आदर देण्यात शिकतो”.

तर काहींनी हा निर्लज्जपणाचा कळस असून, कोणताही सुसंस्कृतपणा नाही अशी टीका केली आहे. तसंच एकाने ‘ही आपली संस्कृती नाही, कृपया हे करु नका, आई देवीप्रमाणे आहे. तिचा अपमान करु नका,’ असं म्हटलं आहे. 

छावीने 2004 मध्ये दिग्दर्शक मोहित हुसेनशी लग्न केलं. 2012 मध्ये त्यांना पहिलं मूल झालं. नंतर 2019 मध्ये त्यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन झालं. 

छावी मित्तलने 2015 मध्ये पती मोहितसह डिजिटल प्रोडक्शन कंपनी Shitty Ideas Trending (SIT) सुरु केली. याशिवाय तिने ‘3 बहुरानिया’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘बंदिनी’, ‘नागिन’, ‘विरासत’ आणि ‘कृष्णदासी’ यासह अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *