Headlines

तू अजिबात सुंदर नाहीस…; Yuzvendra Chahal चं पत्नी Dhanashree उत्तर!

[ad_1]

मुंबई : युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर फार एक्टिव्ह असतात. यादरम्यान, ते आपापसात अनेक व्हिडिओ देखील शेअर करतात. हे व्हिडिओ प्रत्यक्षात इंस्टाग्राम रील आहेत जे लोकांना खूप आवडतात. या कपलचे अनेक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील, ज्यात ते लोकांना हसवताना दिसतात. काही रोमँटिक असतात तर काही फनी असतात. 
सध्या या जोडप्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय, मात्र यामध्ये चहलने पत्नीच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ज्यानंतर धनश्रीची दिलेली रिएक्शन चांगलीच व्हायरल होतेय.
कोरिओग्राफर आणि क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ एक इंस्टाग्राम रील आहे ज्यामध्ये ती आणि चहल लिप सिंक करताना दिसतायत. 

 

 
 

 

View this post on Instagram

 

 
 
 

 
 

 
 
 

 
 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

या व्हिडिओमध्ये चहल धनश्रीला विचारतो की, तुला कोणी कधी सुंदर म्हटलं आहे का? याला उत्तर देताना ती निराश होऊन म्हणते की नाही. यानंतर चहल म्हणतो की, सुंदर असशील तर कोणी म्हणेल ना. यानंतर तो गॉगल लावून स्वॅग दाखवतो.
धनश्रीला हे ऐकून धक्काच बसला. त्याच वेळी, या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “यामध्ये काहीही सत्य नाहीये.”
चहल सध्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहे. गेल्या काही काळापासून त्याची कामगिरी चांगली नसली तरी, त्याचे चाहते आणि संपूर्ण टीम इंडिया त्याच्याकडून वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा करतायत.


Updated: Oct 6, 2022, 11:09 AM IST



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *