[ad_1]
एखाद्या यूजर्सने त्यांच्या फोनमध्ये तुमचा नंबर सेव्ह केलेला असल्यास तुमचा मोबाइल नंबर देखील Truecaller वर उपलब्ध असू शकतो. अॅप सर्व स्कॅम कॉल ट्रॅक करण्याची देखील सुविधा देते. काही लँडलाइनसाठी ट्रूकॉलरमध्ये लँडलाइनच्या अॅड्रेसचा देखील समावेश आहे. TrueCaller डेटाबेसमध्ये तुमचा मोबाइल नंबर उपलब्ध असल्याने तुम्ही कोणालाही कॉल केल्यास त्वरित त्याची माहिती मिळते. तुम्हाला जर TrueCaller वरील तुमचा मोबाइल नंबर डिलीट करायचा असल्यास सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल. TrueCaller अॅपमधील तुमचा फोन नंबर कसा डिलीट करू शकता, याविषयी जाणून घेऊया.
असे डिलीट करू शकता Truecaller account
- सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये Truecaller अॅप ओपन करा व डाव्या बाजूला वरती असलेल्या मेन्यू सिलेक्ट करा.
- मेन्यू सेटिंग्स निवडल्यानंतर पुढील स्टेपवर जा.
- सेटिंग्समध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळे पर्याय दिसतील. आता ट्रूकॉलर अकाउंटला कायमचे डिलीट करण्यासाठी मेन्यूमधील प्रायव्हसी सेंटर हा पर्याय निवडा.
- आता तुम्हाला ट्रूकॉलर अकाउंट डिलीट करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता Truecaller Search मधून नंबर डिलीट करण्यासाठी Yes पर्यायावर टॅप करा.
- ही स्टेप पूर्ण केल्यानंतर ट्रू कॉलर डेटाबेसमधून तुमचा नंबर डिलीट होईल.
वाचा: लिस्ट तयार ठेवा! उद्यापासून सुरू होतोय Flipkart चा भन्नाट सेल, खरेदीवर होईल ‘महाबचत’; सुरुवाती किंमत फक्त २९९ रुपये
वाचा: तुमचे पॅन कार्ड वापरून इतर कोणी कर्ज तर घेतले नाही? ‘या’ सोप्या प्रोसेसने मिळेल सर्व माहिती
वाचा: मोफत घ्या Netflix, Hotstar आणि Prime सबस्क्रिप्शनचा आनंद, Jio च्या ‘या’ प्लानमध्ये मिळतील अनेक फायदे; किंमत फक्त…
वाचा: Amazon-Flipkart पेक्षा स्वस्तात प्रोडक्ट्स विकत आहे ‘हे’ सुपर अॅप, खरेदीवर रिवॉर्ड्सही; पाहा डिटेल्स
[ad_2]