Headlines

“ट्रक, टेम्पो कमी पडतील इतकी सदस्यसंख्या वाढवा” उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आवाहन, शिंदेगटाला लगावला टोला | Uddhav Thackeray appeals to office bearers to increase number of members rmm 97

[ad_1]

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या वाहतूक सेनेकडून नवीन सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आज काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे ११ हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रे जमा केली आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

नवीन सदस्यांचे सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे, इतकी सदस्यसंखा वाढवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे. नवीन सदस्य नोंदणीसाठी काम करणाऱ्या वाहतूक सेनेचंही त्यांनी यावेळी आभार मानले आहेत.

हेही वाचा- ‘मुंबईतून सगळं गुजरातला नेलं जातंय’ म्हणणाऱ्या शिवसेनेला शेलारांचं प्रत्युत्तर; पब, पेग आणि पेंग्विन सेनेचा उल्लेख करत म्हणाले…

पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजेत, एवढी आपली सदस्यसंख्या वाढत आहे. ही सगळी तुमची मेहनत आहे. आपल्याकडे आता कुणी भाडोत्री लोकं राहिली नाहीत. जे आहेत ते सर्वजण तन-मन-धन सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारी लोकं आहेत. बाकी जे काही बोलायचं आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. याबाबत काहीही वाद नाही.”

हेही वाचा- “जेव्हा टीव्ही बघते, तेव्हा मुख्यमंत्री…” घरगुती दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला

शिंदे गटातील नेत्यांना टोला लगावताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “लढण्याचा एक काळ असतो, वाहतूक सेना म्हटल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची सवय असते. रस्त्यात खड्डे असतात तरीही आपल्याला तो रस्ता पार करायचा असतो. हे खड्डे तर आपण पार करूच, पण जे खड्डे पडलेत, त्याचं काय करायचं? हे आपण उद्या बघू…”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *