Headlines

‘परंपरेच्या बाजारात अक्कल…’, संभाजी भिडेंच्या ‘कुंकू लाव’ विधानावर सुप्रिया सुळेंची टीका, फेसबुकवर शेअर केली पोस्ट | NCP Supriya Sule on Shivpratishthan Sambhaji Bhide controversial statement sgy 87

[ad_1]

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. एका महिला पत्रकाराने कुकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असं विधान त्यांनी केलं असून यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संभाजी भिडे यांच्यावर टीका केली असून, फेसबुकला हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केली आहे.

“आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले “भारतमाता विधवा…”

बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, ‘तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?’ यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही,” असं वक्तव्य भिडे यांनी केलं.

सुप्रिया सुळेंनी शेअर केली कविता –

तू आणि मी ….?
मी लावतो टिळा
तू लाव टिकली
परंपरेच्या बाजारात
अक्कल आम्ही विकली
मी लावतो भस्म
तू लाव कुंकू
गुलामीचा शंख
दोघे मिळून फुंकू
तू घाल मंगळसूत्र
मी घालतो माळ
मनूने मारलेली रेषा
मनोभावे पाळ
तू घाल बांगड्या
माझ्या हातात गंडा
मुकाट्याने ऐक नाहीतर
आमच्या हातात दंडा
मी घालतो मोजडी
तू जोडवे घाल
सप्तपदी च्या मर्यादेत
जन्मभर चाल
तू घाल अंबाडा
मी शेंडी राखतो
विज्ञानाच्या प्रगतीला
परंपरेने झाकतो
मी घालतो टोपी
तू घाल बुरखा
बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे
एकमत आहे बर का…!!!
मी धोतरात, तू शालूत
होऊ परंपरेचे दास
साने गुरुजी ते भिडे गुरुजी
महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!

  • हेरंब कुलकर्णी

महिला आयोगाकडून दखल

महिला आयोगाने संभाजी भिडेंच्या विधानाची दखल घेतली असून त्यांना नोटीस पाठवली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. “संभाजी भिडे यांनी यापूर्वीही ‘आंबे खाल्याने मुलं होतात’, असं वक्तव्य केलं होतं. एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे,” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

‘कुंकू लाव मगच बोलतो’ संभाजी भिडेंच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल; चाकणकर म्हणाल्या, “समाजाची विकृती…”

“ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे. महिला आयोगाच्या वतीने याचा जाहीर निषेध व्यक्त करते. तसेच, संभाजी भिडेंना महिला आयोगाच्या वतीने नोटीस पाठवण्यात येईल. त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा,” असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *