Headlines

‘मशाल’ चिन्ह मिळताच उद्धव ठाकरे गटातील महिला नेत्याचे महत्त्वाचे विधान; म्हणाल्या “शिवसैनिकांनो आयुष्याच्या…” | kishori pednekar comment on uddhav thackeray torch symbol

[ad_1]

निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला दोन वेगवेगळी नावे दिली आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाने दिलेली तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगाने अमान्य केली आहेत. शिंदे गटाला आता नव्या चिन्हांची यादी द्यावी लागणार आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव मिळाले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना; असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता मशाली पेटवा. उष:काल झाला आहे, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

हेही वाचा >>> मोठी बातमी! शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आम्हाला नाव मिळाले आहे. आम्ही पहिली लढाई जिंकली आहे. आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवून हे चिन्ह प्रत्येक घराघरात पोहोचवायचे आहे. काही लोकांनी आपल्या पक्षात काळरात्र निर्माण करण्याचे ठरवले. आता उष:काल सुरू झाला आहे. ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे, हे आता दाखवायचे आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> अतुल भातखळकर यांचे आक्षेपार्ह ट्वीट, मुलायमसिंह यादव यांचे नाव घेत म्हणाले; “कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या…”

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आम्ही खूप समाधानी आहोत, असे म्हस्के म्हणाले आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव तसेच त्यांचे तत्त्व घेऊन पुढे जात आहोत. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव भेटल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. चिन्हांचे पर्याय देण्यासाठी आम्हाला उद्या सकाळपर्यंत वेळ मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही नव्या चिन्हांची यादी देऊ. आम्हाला खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे. शिवसेनेने बाळासाहेबांचा विचार सोडला, तत्व सोडले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला त्यांच्या विचाराप्रमाणेच नाव मिळाले आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंच्या खासगी सचिवांशी खरंच वाद झाला? अब्दुल सत्तार यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले “मी फक्त…”

दुसरीकडे शिंदे गटाची तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे. या आदेशाप्रमाणे शिंदे गटाला उद्या सकाळपर्यंत तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत आयोग निर्णय घेणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *