Headlines

Topless Photoshoot करणारी ‘ही अभिनेत्री होती चर्चेत, मग का झाली बॉलिवूडमधून अचानक गायब?

[ad_1]

Mamta Kulkarni Topless Photoshoot : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) ही 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. ममतानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. ममतानं बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते शाहरुख खान (Shahrukh Khan), आमिर खान (Aamir Khan) आणि सलमान खानसोबत (Salmna Khan) काम केले आहे. इतकं असताना ममताच्या आयुष्यात सगळं काही चांगल्या प्रकारे सुरु होतं, पण तेव्हाच तिच्यासोबत अशा घटना घडत गेल्या. त्यानंतर ममतानं एक टॉपलेस फोटोशूट केले. या फोटोशूटनंतर ममता अचनाक चर्चेत आली होती. दरम्यान, यानंतर ममताचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे म्हटले जात होते. (Mamta Kulkarni Topless Photo Shoot) 

रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्सक आणि निर्मात्यांना अंडरवर्ल्डमधून ममताला चित्रपटात कास्ट करा हे सांगण्यासाठी फोन यायचे. यामुळे ममताच्या करिअरवर प्रश्न उभे राहू लागले होते. त्यानंतर अशी माहिती समोर आली की ममतानं 2002 साली ड्रग्स माफिया विकी गोस्वामीसोबत गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतर ममतानं बॉलिवूडचा निरोप घेत पतीसोबत केनियात स्थायिक झाली. खरंतर, ममताला या विषयी माहिती नव्हते. ड्रग्स प्रकरणात विकी गोस्वामीचे नाव समोर आले होते. यावेळी त्याचा परिणाम हा अभिनेत्रीच्या आयुष्यावर होऊ लागला होता. (Mamta Kulkarni Underworld Connection)

दरम्यान, ड्रग्स प्रकरणात ममता तिच्या पती विकी गोस्वामीसोबत होती असे म्हटले आहे. त्यामुळे तिला आणि विकीला ताब्यात घेण्यात आले. मात्र, नंतर ती तुरुंगातून बाहेर आली. ममता कुलकर्णी यांच्या आयुष्यावर आधारीत ‘ऑटोबायोग्राफी बाय योगिनी’ (Mamta Kulkarni Biography) नावाचे पुस्तक आहे. रिपोर्ट्सनुसार, ममता आता भिक्षू बनल्या आहेत. काही वर्षांपूर्वी ममताचे संन्यासीच्या वेषातले फोटो व्हायरल झाले होते. (Mamta Kulkarni Bollywood Career) 

बॉबी देओलनं दिली होती  ‘1 नाईट स्टँड’ची ऑफर

दरम्यान, ममताला बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलनं ‘1 नाईट स्टँड’ची ऑफर दिली होती, एका मुलाखतीमध्ये ममताने बॉबीने दिलेल्या ऑफरचा खुलासा केला. 
बॉबी देओलच्या ‘बरसात’ चित्रपटाची शूटिंग सुरू होती आणि तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ममताही तिच्या एका चित्रपटाच्या निमित्ताने त्याच हॉटेलमध्ये थांबली होती. ममताच्या सिनेमात अभिनेते मिथुन चक्रवर्तीही देखील होते. त्याचवेळी मिथुन दा यांनी ममता यांना बॉबी देओलची भेट घडवून आणली होती. ममताचं सौंदर्य पाहून बॉबी तिच्यावर फिदा झाला आणि अभिनेत्रीला ‘1 नाईट स्टँड’ची ऑफर दिली. 

बॉबी देओलच्या वन नाईट स्टँडबद्दल ऐकल्यानंतर ममताने सडेतोड उत्तर दिले. ममता म्हणाली की, जर तुला  माझ्यासोबत एक रात्र घालवायची असेल, तर त्यासाठी आधी गर्लफ्रेंडची परवानगी घ्यावी लागेल….’ त्यानंतर परिस्थिती सावरत मस्करी करत असल्याचं त्याने ममताला सांगितलं. तेव्हा बॉबी आणि पूजा भट्ट एकमेकांना डेट करत होते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *