Headlines

आज भारत पाक हाय व्होल्टेज सामना, हे 6 खेळाडू ठरणार गेमचेंजर

[ad_1]

Sports News : आशिया चषकाला सुरूवात झाली असून अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. आजच्या भारत-पाक हाय व्होल्टेज सामन्याकडे जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या पराभवाची सल प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. दोन्ही संघांकडे गेम चेंजर खेळाडू आहेत. 

भारताचे गेम चेंजर
सुर्यकुमार यादव- 
आयपीएलमध्ये केलेल्या प्रदर्शनानंतर भारतीय संघात जागा मिळवली होती. आयपीएलमध्ये सूर्याने 123 सामन्यांमध्ये 136 च्या स्ट्राईक रेटने 2644 धावा केल्या आहेत. भारताचा मिस्टर 360 डिग्री म्हणून सूर्याने लौकिक मिळवला आहे. सूर्याने इंंग्लंडविरूद्धच्या सामन्यामध्ये ‘क्लासिक’ शतक ठोकलं होतंं. त्यासोबत तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे, त्यामुळे पाकविरूद्धच्या प्लेयिंग 11 मध्ये सूर्याचं स्थान पक्क मानलं जात आहे.   

युजवेंद्र चहल-
मूर्ती लहन पण कीर्ती महान या म्हणीप्रमाणे चहलने ख्याती मिळवली आहे. चहलला सर्वात मोठा धक्का होता तो म्हणजे त्याला 2021 च्या वर्ल्ड कपमधून वगळण्यात आलं होतं. चहललाही मोठा धक्का बसला होता. 2021 नंतर चहलने आपला जलवा दाखवून देत जोरदार कमबॅक केलं. 17 सामन्यात त्याने 27 विकेट घेतल्या. त्यामुळे दुबईच्या मोठ्या विकेट्सवर भारतासाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो.

हार्दिक पांड्या-  
दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिकनेही धमाकेदार पुनरागमन केलं आहे. पहिल्याच सीझनमध्ये गुजरात टायटन्सला IPLचं विजेतेपद जिंकून दिलं. परिस्थितीला अनुसरून पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या महत्त्वाचा ठरू शकतो. पांड्या पॉवर हिटिंग करून सामना एकहाती फिरू शकतो. 

मोहम्मद रिझवान
सलमान बटनंतर बराच काळ पाकिस्तानला आक्रमक फलंदाज मिळाला नव्हता. विशेषत: असा खेळाडू जो सुरुवातीच्या षटकांमध्ये कोणतेही दडपण न घेता फलंदाजी करू शकतो. मात्र मोहम्मद रिझवानने ही जागा भरून काढली. 2021च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचं 152 धावांचा पाठलाग करताना त्याने सिद्धही करून दाखवलं होतं. 

फखर जमान
अनेकदा संघातील सर्वोत्तम फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. जर भारताने विराट कोहलीला हे स्थान दिलं असेल तर पाकिस्तानने ही जबाबदारी फखर जमानला दिली आहे. फखर जमानने 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 106 चेंडूत 114 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांना त्याने फोडून काढलं होतं. पाकिस्तानकडून हा गेमचेंजर ठरू शकतो.

शादाब खान
शादाब रिस्ट स्पीनर असून त्याच्याकडे आपल्या गोलंदाजीने कोणत्याही क्षणी सामन्याचा पालटण्याची क्षमता आहे. त्यासोबतच तोपॉवर हिटरसुद्धा आहे. एवढंच नाही तर शादाब हा अतिशय चपळ असा क्षेत्ररक्षक आहे जो हवेत झेप घेते झेल घेऊ शकतो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *