Headlines

Timepass 3 : समोर कोल्ड्रिंक आणि मागे मुसळधार पाऊस; तरीही हृता दुर्गुळेला फुटला घाम

[ad_1]

Timepass – दगडूचं पहिलं प्रेम काही त्याला मिळालं नाही. प्राजक्ता लेले म्हणजेच प्राजूसाठी दगडूने काय काय केलं, पण ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली. मग पुढे काय? पहिल्या प्रेमात ठोकर खाल्यानंतर दगडूने काय केलं? प्राजू निघून गेल्यानंतर दगडूचं काय झालं? असे अनेक प्रश्न मधल्या आठ वर्षात दगडूवर प्रेम करणाऱ्या टाइमपास प्रेमी प्रेक्षकांच्या मनात घोळत होते. या प्रश्नांनी प्रेक्षकांना हैराण केलं होतं. तर अशा या हैराण प्रेक्षकांसाठी थंडगार कोल्ड्रिंक हॉट अंदाजात घेऊन आलेल्या हृता दुर्गुळेच्या रावडीलुक पालवीने या सिनेमात अक्षरश: आग लावली आहे. ज्या कोल्ड्रिंक गाण्यावर हृता आणि प्रथमेश ही जोडी थिरकली आहे त्या गाण्याचा अंदाज पडद्यावर जरी हॉट दिसत असला तरी त्यामागे नेमकं काय सुरू होतं याचा किस्सा हृताने शेअर केला आहे.

टाइमपास सिनेमाच्या पहिल्या दोन्ही भागांमध्ये दगडू आणि प्राजूचं हिंदोळे खाणारं प्रेम शेवटी सफल काही झालच नाही. मग मात्र दगडू कॉलेजात गेला, सुधारला, शुध्द बोलू लागला. या वळणावर त्याला भेटलेल्या पालवीने दगडूच्या आयुष्यात हिरवळ आणली. दगडूच्या दुसऱ्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या टाइमपास ३ या सिनेमाची पर्वणी झी टॉकीजने आणली आहे. रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर टाइमपास ३ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हृता आणि प्रथमेश यांची जोडी, हृताचा बिनधास्त लुक आणि सुधारलेल्या दगडूचा शुध्द बोलण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत.

टाइमपास सिनेमाचा प्रत्येक भाग अनेक गोष्टींसाठी गाजला. पहिल्या भागातलं ‘मला वेड लागले प्रेमाचे” हे गाणं असो किंवा दुसऱ्या भागातील मोठा झालेला दगडू असो तर तिसऱ्या सीझनमधल्या कोल्ड्रिंक वाटतेस गाण्यावरच्या भन्नाट स्टेप्स. प्रथमेशने सिनेमाच्या पहिल्या भागात जो बिनधास्तपणा दाखवला तो दाखवण्याची वेळ आता तिसऱ्या भागात हृतावर होती. आजवरची मालिकेतील इमेज ब्रेक करत कोल्ड्रिंक वाटतेस या गाण्यावर बेभान नाचणाऱ्या हृताने प्रथमेशच्या जोडीने धूर काढला. याच गाण्याची खरी स्टोरी हृताने सांगितली आणि पडद्यावर दिसणाऱ्या कोल्ड्रिंक वाटतेस हे गाणं कसं शूट केलं याचाही किस्सा सांगितला.

हृता म्हणाली, करोनाच्या दुसरा लॉकडाउन लागण्याआधी चार दिवस या सिनेमाचं पॅकअप झालं. पण कोल्ड्रिंक वाटतेस हे गाणं शूट करायचं राहूनच गेलं होतं. सिनेमा रिलीज होण्याआधी हे गाणं शूट करण्याची तयारी सुरू केली. ठाण्यातील एका रस्त्यावर हे गाणं शूट करण्यात आलं आहे. पण हे गाणं शूट करत असतानाच मुसळधार पावसानेही सुरूवात केली. पाऊस काही थांबायचं नाव काढत नव्हता. जिथे माझ्या आणि प्रथमेशच्या डान्सस्टेप्स आहेत तेवढया भागावर प्लास्टिक छत धरून  आमचं कोल्ड्रिंक वाटतेस गाणं शूट करण्यात आलंय.

हृता पुढे म्हणाली, “एकतर या गाण्याला असलेला स्पीड, प्रचंड एनर्जीची गरज, श्वासही घ्यायला जागा नाही इतक्या फास्ट स्टेप आणि पावसाचं थैमान यामध्ये कोल्ड्रिंक गाण्यातील हॉट अंदाज दाखवताना मलाच घाम फुटला होता. थोडा सीक्वेन्स शूट झाला की रस्ता ड्रायरने वाळवायचा, प्लास्टिकचे कागद लावायचे आणि पुढची डान्सस्टेप शूट करायची असा सगळा प्रकार सुरू होता. जेव्हा कोल्ड्रिंक वाटतेस हे गाणं पूर्ण झालं तेव्हा खरोखरच मला कोल्ड्रिंक पिण्याची वेळ आली होती.” 

मराठीमध्ये सिक्वेल सिनेमाचा फंडा हिट करण्यात टाइमपास ३ या सिनेमाने बाजी मारली आहे. टाइमपास ३ हा सिनेमा पाहण्याची पर्वणी झी टॉकीज वाहिनीवर रविवारी २० नोव्हेंबरला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता मिळणार आहे. हृताच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर असून नेहमी सोज्वळ दिसणाऱ्या हृताची भाईगिरी, आणि शुध्द बोलणाऱ्या हृताची अशुध्द भाषा प्रेक्षकांना थिएटरमध्ये डोक्यावर घेतली होतीच, आता हा आस्वाद झी टॉकीजने घरबसल्या प्रेक्षकांसाठी आणला आहे.

hruta durgule shared her experience with timepass 3 shoot

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *