Headlines

“…तोपर्यंत मी जगात कुणालाही घाबरत नाही” धनंजय मुंडेंची जोरदार डायलॉगबाजी! | NCP leader Dhananjay munde dialogue at parali ganesh festival nath pratisthan rmm 97

[ad_1]

आज संपूर्ण देशात गणरायाचं जोरदार आगमन झालं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील परळी येथे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमातून जोरदार डायलॉगबाजी केली आहे. माझ्या जीवनात अनेक संकटे आली, पण जोपर्यंत माझ्या मातीतील माणसं माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत मी जगात कुणालाही घाबरत नाही, असं विधान धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

गेल्या तीन वर्षात करोना विषाणूच्या संसर्गामुळे गणपती उत्सव साजरा करता आला नाही. पण यावेळी तुम्ही मोठ्या संख्येनं उपस्थित राहीला आहात. आजपासून पुढील दहा दिवस नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आणि प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहनही मुंडे यांनी केलं.

हेही वाचा- पंजाब : सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून चर्चची तोडफोड; कारला लावली आग, परिसरात तणाव

यावेळी ते म्हणाले की, माझ्या जीवनात अनेक प्रकारची संकटं आली. कोविडच संकट आलं, राजकीय संकट आलं. पण जोपर्यंत माझं नातं माझ्या मातीतल्या माय माऊलींशी, वडिलधाऱ्यांशी आणि माझ्या भावांशी जुळलेलं आहे, तोपर्यंत मी या जगात कुणालाही घाबरत नाही. आजपासून पुढील दहा दिवस नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांतून प्रभू वैद्यनाथाच्या नगरीला कसल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्या, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

हेही वाचा- पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

करोना काळात नाथ प्रतिष्ठानने केलेल्या विविध सामाजिक कामांची माहितीही धनंजय मुंडेंनी यावेळी दिली. करोना काळात ५६ हजार कुटुंबाना धान्य देण्याचं काम नाथ प्रतिष्ठानने केलं. सत्ता असो वा नसो…नाथ प्रतिष्ठान आपलं काम करत राहील, असंही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणाचा शेवट राहत इंदौरी यांच्या एका शायरीनं केला आहे. ते म्हणाले की, “राह में खतरे कितने भी हो, लेकिन ठहरता कौन है… मौत कल आती है, आज आ जाए… अरे डरता कौन है? तेरे लष्कर के मुकाबले मैं अकेला हूँ… मगर फैसला मैदान में होगा कि मरता कौन है?”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *