Headlines

‘चोली टाइट बांध लें ताकि… ‘; करीना, तब्बू आणि क्रिती सेननच्या The Crew चा टीझर तूफान व्हायरल

[ad_1]

The Crew : गेल्या अनेक दिवसांपासून चाहते अभिनेत्री करीना कपूर खान, क्रिती सेनन आणि तब्बू यांच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत होते. आज त्या तिघींनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. त्यांच्या ‘द क्रू’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे. त्यासोबत त्यांनी या चित्रपटाची पहिली झलक देखील शेअर केली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे या टीझरच्या बॅकग्राऊंडला असलेल्या म्युजिक आणि व्हॉईस ओव्हरनं वेधलं आहे. 

राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘द क्रू’ ची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटात करीना कपूर खान, क्रिती सेनन आणि तब्बू यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात दिलजीत दोसांझ हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बराच काळा प्रतिक्षा केल्यानंतर अखेर चाहत्यांना चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. 

आज करीनानं तिच्या चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आगामी चित्रपटाची झलक शेअर केली आहे. तर या व्हिडीओत करीना, तब्बू आणि क्रिती या एअर हॉस्टेसच्या भूमिकेत दिसत आहेत. तर त्यांनी लाल रंगाच्या युनिफॉर्म परिधान केला आहे. मात्र, या टीझरमध्ये त्यांचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. तर या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचं म्युजिक ऐकू येतंय. त्यानंतर ऐकू येत असलेल्या व्हॉइस ओव्हरमध्ये एक व्यक्ती बोलते की ‘देवियों और सज्जनों मैं आपका कैप्टन बात कर रहा हूं. आज की फ्लाइट में आप सबका स्वागत है. हमारा क्रू आपका बहुत ख्याल रखेगा. लेकिन आप सभी से एक निवेदन है कि अपनी चोली टाइट बांध लें ताकि दिल बाहर ना गिर जाए.’ हा व्हिडीओ शेअर करत करीनानं कॅप्शन दिलं आहे की तयार रहा आणि तुमचे पॉपकॉर्न देखील तयार ठेवा आणि ते सर्व्ह होण्यासाठी देखील तयार रहा. ‘द क्रू’ मार्चमध्ये तुम्हाला सगळ्यांना भेटायला चित्रपटगृहात येतोय. 

हेही वाचा : वर्षभराच्या राहामध्ये आतापासूनच आहे ‘हा’ गुण! आजोबा महेश भट्ट यांचा खुलासा

दरम्यान, सुरुवातीला हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, आता प्रदर्शनाची तारिख ही बदलली आहे. 22 मार्च नाही तर त्याच्या बरोबर एक आठवड्यानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. करीनाप्रमाणए, हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर या चित्रपटात कॉमेडियन कपिल शर्माची पाहुण्या कलाकाराची भूमिका असणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *