Headlines

‘ती’ एक चूक करीना कपूरला पडली महागात, सैफ अली खान झाला नाराज?

[ad_1]

मुंबई : सैफ आणि करिनाने लग्नानंतरही आपलं प्रोफेशन बदललं नाही. उलट लग्नानंतर करिनाने आपलं करिअर अजून मजबूत बनवलं. एकीकडे सैफने जिथे आपल्या सिनेमातून अनेक एक्सपेरिमेंट सुरु केले. तर दुसरीकडे करिनाने देखील आपल्यामध्ये अनेक बदल केले.  

सैफ अली खान  (Saif Ali Khan) आणि करिना कपूर खान (kareena Kapoor Khan) बॉलिवूडचं सगळ्यात पॉप्यूलर कपलपैकी एक आहे. मात्र करण (Karan Johar) ने नुकतंच त्याच्या एका चॅट शोमध्ये करिना कूपने एक मोठा खुलासा केला आहे की, कमबख्त इश्क सिनेमात अक्षय कुमार  (Akshay Kumar) सोबत तिचा किसींग सिन पाहून सैफ अली खान नाराज झाला होता. 

करण जोहरने जेव्हा करिनाला विचारंल की, सिनेमात किसींग सीनमुळे तुम्हाच्यात कधी भांडण झालं आहे का? या प्रश्नावर करिना खुलासा करत म्हणाली की, मी त्याला हा सिनेमा रिलीज व्हायचा आधीच सैफला कल्पना दिली होती मात्र, जेव्हा सैफने माझा आणि अक्षय कुमारचा किसींग सीन पाहिला तेव्हा तो खूप नाराज झाला यानंतर आम्ही दोघांनीही किसींग पॉलिसी फॅालो केली. 

 करण जोहरच्या शोमध्ये करीना पुढे म्हणाली, ‘सैफ आणि मी एकमेकांबद्दल खूप ओपन आहोत. मी त्याला वॉर्निंग दिली होती की, कमबख्त इश्क या चित्रपटात माझा किसींग सीन आहे.  तेव्हा तो मला म्हणाला होता की, ‘हे तुझे काम आहे.’ मात्र त्यानंतर आम्ही दोघं याविषयी एकमेकांशी बोललो आणि स्क्रीनवर किसिंग सीन न करण्याचा निर्णय घेतला. कारण याने त्रासही होतो आणि तुम्हाला टेन्शनही नाही’.

एवढंच नाही तर या शोमध्ये करिनाने सैफला ‘लव्ह आज कल’ मधील दीपिका पदुकोणसोबतच्या किसिंग सीनबद्दलही छेडलं, ज्यावर सैफ लगेच म्हणाला- ‘एवढी छोटी किस होती, कमबख्त इश्क सिनेमातील किस कपाला म्हणून नाही तर मी इथे बसलोही नसतो.”

सुरुवातीला संस्कारी इमेजमध्ये दिसणाऱ्या करीना कपूरचा बोल्ड अंदाज काही दिवसातच दिसू लागला. ती अशी एक अभिनेत्री आहे जिने आपल्यापेक्षा 15 वर्षे मोठ्या ते पाच वर्षे लहान अभिनेत्यांना ऑनस्क्रीन किस केलंय.

सैफ अली खान आणि करिना कपूर यांची लव्हस्टोरी ‘टशन’ सिनेमापासून सुरु झाली. आता हे दोघं दोन मुलांचे पालक आहेत. दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात.सैफ आणि करिनामध्ये १० वर्षांचं अंतर आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान करिनाला समजलं की ती प्रेग्नंट आहे. काहि महिन्यांतच तिने तैमुरला जन्म दिला. करिना आणि सैफमध्ये १० वर्षांचं अंतर आहे. मात्र त्यांच्या वयाचं अतंराचा  परिणाम त्यांच्या दोघांच्या पर्सनल आयुष्यावर कधीच झाला नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *