Headlines

WhatsApp वर तीन ब्लू टिक म्हणजे सरकार तुमचे मेसेज पाहातंय? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मेसेजमागील सत्य काय?

[ad_1]

नवी दिल्ली : WhatsApp Three Blue tick Twitter : सध्या सरकार व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची हेरगिरी करत असल्याचा दावा केला जात आहे. याबाबतचा एक स्क्रीनशॉट व्हायरल केला जात आहे. पण या मेसेजमध्ये आणि या गोष्टीत किती तत्थ आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. व्हॉट्सअ‍ॅपच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकच टिक म्हणजे मेसेज पाठवला गेला आहे. तर दोन टिक म्हणजे मेसेज समोरच्याकडे पोहोचला आहे. तर दोन टिक ब्लू झाल्या म्हणजे तुमचा पाठवलेला संदेश वाचला गेला आहे.

मात्र, आता व्हॉट्सअ‍ॅपबाबत आणखी एक व्हायरल दावा केला जात आहे, ज्यामध्ये तीन ब्लू टिक्स दिसत आहेत, ज्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की, तीन टिक्स म्हणजे सरकार तुमचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचत आहे असा याचा अर्थ आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सरकारचे नियंत्रण असल्याचा दावा केला जात आहे. तीच दोन ब्लू टिक आणि एकच लाल टिक म्हणजे सरकार तुमच्यावर कारवाई करू शकते. तसेच आणखी वेगवेगळ्या टिकचा अर्थ म्हणजे सरकार तुमचा डेटा तपासत आहे. पण या सर्वाबाबत थेट सरकारने आता स्पष्टीकरण दिलं आहे.
वाचा :Online Scam : जास्त पैसे कमावण्याच्या नादात बसला लाखोंचा गंडा, एक क्लिक आणि खात्यातून ९.३५ लाख गायब

याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले आहे
या प्रकरणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने फॅक्ट चेक केलं आहे. ज्यात त्यांनी हा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सरकार हेरगिरी करत असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. व्हायरल स्क्रीनशॉट पीआयबीने बनावट असल्याचा शिक्का मारत शेअर केला आहे. यासोबतच या बनावट दाव्याबाबत एक ट्वीटही करण्यात आलं आहे, ज्यामध्ये तीन ब्लू टिकचा दावा चुकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच या तीन टिक्सबाबत सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेली नाही.

वाचा : Instagram Tips : इन्स्टाग्रामवर एकदम क्लिअर व्हिडीओ कसा अपलोड करायचा? लाईक्सचा पडेल पाऊस

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *