Headlines

Pathaan पाहायला जाणाऱ्यांना मिळतायेत फटके; कोण करतंय शाहरूख खानच्या फॅन्सला मारहाण?

[ad_1]

Shahrukh khan:  शाहरूख खानच्या पठाण चित्रपटाला (Pathaan Movie) अनेक हिंदू संघटनांनी विरोध केला. मात्र, चित्रपट रिलीज झाला आणि त्यानंतर बॉक्स ऑफिसवर (Box Office) तुफान चालला. कोट्यवधींची कमाई या चित्रपटाने केली .असं असलं तरी काही संघटनांकडून शाहरूखच्या फॅन्सला धोका असल्याचा दावा करण्यात आलाय. एका व्यक्तीला बेदम चोप दिल्याचा फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. (Shahrukh khan Fans who watching pathaan movie is beaten know the truth) 

त्यात दावा करण्यात आलाय की, पठाण पाहायला जाणाऱ्यांना मारहाण केली जातेय. या व्यक्तीलाही मारहाण झालीय. मात्र, हा खरंच पठाण पाहायला गेला त्यावेळी मारहाण झालीय का? याची पडताळणी आम्ही सुरू केली. 

मारहाणीचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्याने याची पडताळणी आमच्या व्हायरल पोलखोलनं सुरू केली. खरंच शाहरूखच्या फॅन्सला मारहाण होतेय का? अजूनही थिएटरवर हल्ले होतायत का? याचा शोध घेतला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली या बद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

व्हायरल होत असलेला फोटो शाहरूखच्या फॅनचा नाही. पठाण पाहायला जाणाऱ्यांना मारहाण केल्याचा दावा खोटा आहे. व्हायरल फोटो इंदौरच्या तेजाजी नगरमधील घटनेचा आहे भाडेकरूला घरमालकाने मारहाण केल्याचा हा फोटो आहे.

आणखी वाचा – Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor मध्ये जुंपली, एकमेकांबद्दल संताप व्यक्त करत म्हणाले… 

या फोटोचा आणि पठाणच्या फॅन्सचा काहीही संबंध नाही. सध्या पठाण हिट होत असल्याने असे फोटो व्हायरल करून लोकांच्या मनात भीती निर्माण केली जातेय. मात्र, आमच्या पडताळणीत हा फोटो खोटा असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे हा दावा असत्य ठरला आहे. 

दरम्यान, चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाने संजीवनी दिली आहे. ‘पठाण’ चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते चित्रपटगृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस होऊनही मिळणारा प्रतिसाद मात्र कायम आहे. जगभरात या चित्रपटाचा बोलबाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *