Headlines

“थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा” | Resign as MLA and face elections Aditya Thackerays challenge to rebellious MLA msr 87

[ad_1]

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज निष्ठा यात्रे अंतर्गत दहिसर येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी करत शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांवर निशाणा साधला. तसेच, थोडी जरी लाज, हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा. असं आव्हानही त्यांनी यावेळी या बंडखोर आमदारांना दिलं.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील दोन आठवडे मी जे बघतोय ते सगळं दु:ख दायकच आहे. म्हणजे ज्यांना तुम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे, ज्यांच्यासोबत तुम्ही प्रचाराला होतात. काही वेळेला मी हे देखील पाहीलं आहे की, या लोकांना तिकीट दिल्यानंतर आपले काही लोक नाराज होतात, की आमच्यावर अन्याय झाला. पण बरोबर आहे हे मी मान्य करतो, कारण निवडणुकीत आपण एकालाच तिकीट देऊ शकतो. ते झाल्यावर त्यांच्या प्रचाराला जायचं. सरकार आलं तर मंत्रीपदं किंवा महामंडळं द्यायची आणि नाही आलं तर त्यांना जपायचं का? तर आपल्यापासून पळून जातील. मी प्रत्येक शाखेत आणि ज्या मतदारसंघात जात आहे तिथे मी एवढंच पाहत आहे की जे पळून गेले ते पळून गेले पण सर्वसाधारण शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच उभा आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान दोन ते तीन असे तगडे शिवसैनिक आहेत, जे आपण लढायला तयार आहेत आणि जिंकायला देखील तयार आहेत.”

काही लोकांना तुम्ही कितीही दिलं तरी त्यांचं पचन होतंच नाही –

तसेच, “मी आज त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करायला आलो नाही. जे निघून गेले ते निघून गेले, आपण त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्यात पण दोन गट आहेत, जे लवकरच कळतील. कारण, एक गट असा आहे ज्याला खरोखर जायचं होतं. त्यांना यातच आनंद मिळतो की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली उतरवलं. काही लोकांच्या राक्षसी महत्वकांक्षा असतात. काही लोकांना तुम्ही कितीही दिलं तरी त्यांचं पचन होतंच नाही, अपचन होतंच असतं. पण दुसरा गट असा आहे ज्याला पळवून नेलं. हे आपल्याला लवकरच समजेल.” असंही आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवलं.

… आणि मग जनता जो निकाल देईल तो मला मान्य –

याचबरोबर, “मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, जे स्वत:च्या मनाने गेले असतील, काही दडपण असतील त्यांच्यावर इतर काही वेगळ्या गोष्टी असतील, त्यांना मला एकच निरोप द्यायचा आहे. जिथे तुम्ही गेलात तिथे आनंदी रहा, सुखी रहा. तुमच्या बद्दल आमच्या मनात राग, द्वेष नाही. दु:ख निश्चित आहे की आम्ही तुम्हाला शिवसैनिक समजायचो, तुमच्यावर विश्वास ठेवला होता. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, तुमच्यात थोडी जर लाज उरली असेल, हिंमत उरली असेल तर पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा आणि मग जनता जो निकाल देईल तो मला मान्य आहे.” असं आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिलं.

मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत –

तर, “ज्यांना परत यायचं आहे, त्यांना मी एवढच सांगतोय मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, अगोदरही होते व पुढे राहतील. आमचं मन मोठं आहे. जसा त्यावेळी आम्ही विश्वास ठेवला तसाच विश्वास आम्ही प्रत्येक शिवसैनिकावर टाकत असतो.” असंही यावेळी आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *