Headlines

तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते; S#* कॉमेडी चित्रपट करण्यावर Riteish Demukh च मोठ वक्तव्य

[ad_1]

Riteish Deshmukh Birthday Special : बॉलिवूड अभिनेका रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. उद्या म्हणजेच 17 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. रितेश उद्या त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करणार आहे. रितेश सध्या त्याच्या आगामी ‘वेड’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यावेळी रितेशनं दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात रितेश आपल्याला एक सीरिअस भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेशनं आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, आपण सगळ्यांना त्याला नेहमीच कॉमेडी भूमिका साकारताना पाहिलं आहे. रितेशला कॉमेडी अभिनेता म्हणून ओळख असण्यात काहीही हरकत नाही आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रितेशनं त्याच्या चित्रपटांच्या निवडीविषयी बोलताना त्याला कसली लाज नाही असे म्हटले आहे. 

पाहा काय म्हणाला रितेश 

रितेशनं ‘ईटाइम्स’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत रितेश ‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’, ‘क्या कुल है हम’, ‘क्या सुपर कुल है हम’ सारख्या सेक्स कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केल्याविषयी बोलला आहे. ‘मी एकमेव अभिनेता आहे ज्याने 4 ते 5 सेक्स कॉमेडी चित्रपट केले आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. हे चित्रपट पाहून भविष्यात माझी मुलं काय विचार करतील याचा विचार मी कधीच केला नाही. जेव्हा मी हे चित्रपट केले तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. कोणत्या चित्रपटामध्ये काम करावं ही माझी पसंती होती. हे कर किंवा हे करू नको असं कधीच माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलं नाही. माझ्या आवडीचं काम त्यांनी मला करू दिलं.”

याविषयी बोलताना रितेश पुढे म्हणाला, ‘माझ्या मुलांना अजूनही हे समजत नाही की पापाराझी, फॅन्स माझ्यासोबत फोटो का काढतात? स्टारडमबाबत त्यांना काहीच माहित नाही. प्रसिद्धी ही तेवढ्या काळासाठीच असते. तुम्ही सुप्रसिद्ध आहात असं तुम्हाला वाटतं पण तुमचा हा भ्रम असू शकतो. माझी मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांचे मित्र त्यांना सांगतात की तुझे वडील स्टार आहेत. अशावेळी मी मुलांना सांगतो की त्यांना जाऊन सांगा की, माझे वडील माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी रोज कामावर जातात.’ 

हेही वाचा : मेहंदी, हळदीचे फोटो एकासोबत आणि लग्न दुसऱ्यासोबतच; ‘गोपी बहू’ने चाहत्यांना केलं हैराण!

रितेश हा बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांपैकी एक असला तरी देखील तो जमिनीशी जोडलेला आहे. रितेशच्या ‘वेड’ या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलिया देखील दिसणार आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, त्यानं ‘वेड’चा ट्रेलर शेअर करताच प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (riteish deshmukh said not ashamed of doing sex comedy films being son of a cm vilasrao deshmukh)  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *