Headlines

700 हून अधिक पुरुषांसोबत ठेवले संबंध, टीव्ही स्टारने खुलासा करताच उडाली खळबळ

[ad_1]

मुंबई : सेलिब्रिटींच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात, चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबाबत जाणून घेण्याबाबत उत्सूकता असते. पण कधी कधी सेलिब्रिटी असे खुलासे करतात जे ऐकूण त्यांच्या चाहत्यांना देखील धक्का बसतो. एका रिअॅलिटी टीव्ही स्टारने देखील असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

टीव्ही स्टारने म्हटलं की, तिने 700 हून अधिक पुरुषांसोबत संबंध ठेवले आहेत. टीव्ही स्टारने तिला सेक्स अॅडिक्शनबद्दल कोणतीही लाज वाटत नसल्याचं देखील म्हटले आहे.

बेलिंडा “लव्ह” रायगियर ((Belinda ‘Love’ Rygier)) असे या रिअॅलिटी टीव्ही स्टारचे नाव आहे. 2017 मधील प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन शो द बॅचलरमध्ये भूमिकेतून तिने ओळख निर्माण केली होती. तिने तिच्या आयुष्यातील एका टप्प्याबद्दल सांगितले जेव्हा ती आठवड्यातून 6 दिवस रोमान्ससाठी जोडीदार शोधत असे.

रेडिओ शो यू आर अ ग्रब मेट मध्ये ३८ वर्षीय बेलिंडा म्हणाली की, सर्व काही ठीक झाल्यानंतर मला माझ्या समस्यांबद्दल कळले. सर्वात मोठा प्रश्न माझ्या नात्याचा होता. मी वाईट माणसांच्या संगतीत होते.

बेलिंडाने 8 वर्षांपूर्वी तिच्या व्यसनावर मात केली. यानंतर ती टीव्ही स्टारपासून रिलेशनशिप गुरू बनली. ती म्हणाली की- बरे झाल्यानंतर मला जाणवले की काही जुन्या अस्पर्शित जखमांमुळे माझ्यात सेक्सचे व्यसन आले होते.

टीव्ही स्टार Belinda ‘Love’ Rygier ने सांगितले की तिचे किती पुरुषांशी संबंध आहेत हे तिला आठवत नाही. बेलिंडा शेवटी म्हणाली की ही संख्या ‘700 पेक्षा जास्त’ असेल. परंतु टीव्ही स्टारने सांगितले की लैंगिक भागीदारांच्या या अडिक्शनबाबत तिला लाज वाटत नाही.

टीव्ही स्टारने पुढे सांगितले- पुरुष मला त्याच गोष्टी सांगत असत ज्या मला ऐकायच्या होत्या. ते लोक या गोष्टीत खूप चांगले आहेत. सेक्सपेक्षा हे सर्व एका सुंदर भावना आणि प्रेमाच्या नावावर होते.

शेवटी म्हणाली की, आपण सेक्सचा वापर अत्यंत चुकीच्या अर्थाने करतोय जो क्षणिक आनंद आहे. ज्याच्यामध्ये मला आता काहीही छान वाटेल त्याच्यासोबत मी आता खास क्षण घालवणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *