Headlines

‘जुनं फर्निचर’ मधील मनाला भिडणारे महेश मांजरेकरांनी गायलेलं ‘काय चुकले सांग ना ?’ गाणं प्रदर्शित

[ad_1]

Mahesh Manjrekar Sing a song forJuna Furniture : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट ‘जुनं फर्निचर’ लवकरच भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमधून एक गोष्ट कळते ती म्हणजे हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर आधारीत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. तर दुसरीकडे आता ‘जुनं फर्निचर’ मधील खूप सुंदर, भावपूर्ण गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘काय चुकले सांग ना ?’ असे या गाण्याचे बोल आहे. तर हे गाणं वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले आहे.  तर डीएच हार्मोनी एसआरएम एलियन यांनी संगीत संयोजन केले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला खुद्द महेश मांजरेकर यांचा आवाज लाभला आहे. 

गाण्याबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ”या गाण्याच्या प्रत्येक शब्दांत अर्थ दडलेला असून मनाचा ठाव घेणारे हे गाणं आहे. हे गाणे मला गायला मिळालं, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मनातील घालमेल आणि मनाला मिळणारी उभारी अशा दोन्ही भावना या गाण्यात आहेत. हे गाणं म्हणजे चित्रपटाचा कणा आहे. चित्रपटाची कथा पुढे नेणाऱ्या या गाण्याला संगीत टीमही तितक्याच ताकदीची लाभली आहे.”

चित्रपटाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, ”हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापैकीच एक ‘ओल्ड फर्निचर’ म्हणजेच ‘जुनं फर्निचर’. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली ‘जुनं फर्निचर’ म्हणतात, परंतु हेच जुनं फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असतं, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. यात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना ‘जुनं फर्निचर’बद्दलचा दृष्टिकोन बदलावणारा हा चित्रपट आहे.”

हेही वाचा : सलमाननं बर्थडे साँग गाताच अनंतला हसू अनावर! नेटकरी म्हणे, ‘भाई काहीपण कर, पण तू…’

या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर,  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. तर यतिन जाधव ‘जुनं फर्निचर’चे निर्माते आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या 26 एप्रिल रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *