Headlines

अशोकाचं पानांचं धार्मिक महत्त्व, नव्या वर्षात करा ‘हे’ उपाय राहील सुख-शांती

[ad_1]

Ashoka Tree New Year 2023 : नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती असं काही काम करतो, ज्यानं त्यांच पुढचं वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं सुरु होईल. नवीन वर्षात पूजा पाठ करून घर सजवले जाते. यासोबतच घराच्या मुख्य दारात फुलं आणि आंबा किंवा मग अशोकाच्या पानांनी बनवलेलं तोरण लावलं जातं. आंब्याच्या पानांबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. पण  हिंदू धर्मात अशोकाच्या पानांनाही खूप महत्त्व आहे. अशोकाची पान माणसाच्या प्रत्येक दुःखाचा नाश करतो. रामायणातही अशोक वाटिकेचा उल्लेख आहे. जेव्हा लंकापती रावणानं माता सीतेचे अपहरण करून त्यांना लंकेत आणले होते तेव्हा त्यांनी अशोक वाटिकेतच आश्रय घेतला होता. यामुळेच नवीन वर्षात अशोकाच्या पानांनी काही उपाय केले जाऊ शकतात, हे केल्याने सौभाग्य प्राप्त होते. (Astrology)

नवीन वर्षात अशोकाचं मूळ आणा आणि ते धुवून वाळवा. यानंतर ते तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवा. असे केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल. नवीन वर्षात अशोकाची पानं, फुलं इत्यादींनी तोरण बनवून मुख्य दरवाजावर लावावे. असे केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल. यासोबतच तुमच्या घरात अधिक सकारात्मक ऊर्जा येईल. लक्षात ठेवा की अशोकाची पाने सुकली की त्यांना बदला.

हेही वाचा : Supari Upay: सुपारी तोडग्यामुळे गणपती बाप्पा होणार प्रसन्न, जाणून ज्योतिषशास्त्रीय उपाय

वैवाहिक जीवनात अडथळे 

जर काही कारणानं तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही अशोकाची पाने टाका. यानंतर ही पानं कोणत्याही झाडाखाली ठेवा. असं केल्यानं येत्या वर्षभरात तुमचं लग्न लवकर होईल.

घराच सुख-शांतीसाठी

जर कुटुंबातील सदस्य किंवा जोडप्यांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल तर घरातील मोठ्या व्यक्तीने अशोकाच्या झाडाला नियमित पाणी द्यावे, असे केल्याने घरात सुख-शांती नांदते.

सुखी वैवाहिक जीवनासाठी

पती-पत्नीमध्ये सतत तणाव असेल तर अशोकाची सात पानं आणून देवासमोर ठेवा. सुकल्यावर पुन्हा नवीन ठेवा. असं केल्यानं वैवाहिक जीवनात आनंद राहील. (In New Year 2023 with ashoka tree do these upay for success money fame and love) 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *