Headlines

“जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे…”; कोरेगाव – भीमा शौर्यदिनानिमित्त अरुण कदम यांनी पोस्ट चर्चेत

[ad_1]

Battle of Koregaon Bhima : कोरेगाव-भीमा ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झालीय. नगर रस्त्यावरील पेरणे फाटा (Perne Phata) येथे असलेल्या या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी जमतात. गेली दोन वर्षे कोरोना  संकटामुळे भीमा कोरेगाव अभिवादन कार्यक्रम होऊ शकला नव्हता. मात्र यावर्षी कोणत्याही निर्बंधाशिवाय हा अभिवादनाचा कार्यक्रम पार परड आहे. सोशल मीडियावरही कोरेगाव – भीमाबाबतच्या इतिहासाबाबत सातत्याने चर्चा होत आलीय. त्यामुळे राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच याबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत. 

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अरुण कदम (Arun Kadam) यांनीही कोरेगाव-भीमाबाबत केलेल्या एका पोस्टमुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. अरुण कदम हे नेहमीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही ते सातत्याने पोस्ट शेअर करत असतात. कोरेगाव – भीमा शौर्यदिनानिमित्त अरुण कदम यांनीही एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

“विजयस्तंभ भिमा कोरेगाव ऐतिहासिक पुरावा” या आशयाखाली “तुम्ही शूर वीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की, तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात,” असे लिहिलेले पोस्टर अरुण कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे केलेल्या भाषणातील हे वक्तव्य असल्याचे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

भीमा कोरेगावच्या लढाईत गुलामी संपली – प्रकाश आंबेडकर

“आजचा आनंदाचा दिवस आहे.आजचा दिवस सामाजिक आणि स्वातंत्र्याचा हा लढा आहे.या देशाला हजारो वर्ष गुलामी होती आणि राजकीय गुलामी देखील होती. या भीमा कोरेगावच्या लढाईत गुलामी संपली. भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास येथून सुरवात होतो. त्यामुळे हजारो लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात,” अशा भावना प्रकाश आंबेडर यांनी आजच्या दिनानिमित्त केल्या आहेत.

सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष

दरम्यान, अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने पोलिसांनी सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या मेसेज, पोस्टवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पुणे पोलीस, ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जाणाऱ्या मेसेजवर लक्ष ठेवण्यात येत आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयानांनी पोलिसांना सहकार्य करून कार्यक्रम शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *