Headlines

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला , बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील घटना

बार्शी/प्रतिनिधी – दिनांक 23 सप्टेंबर रोजी मौजे गुळपोळी येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास खंडू हनुमंत काळे यांच्या घरी चोर शिरले होते. कुलपाच्या तोडण्याच्या आवाजाने शेजारच्या शेडमध्ये झोपलेल्या खंडू हनुमंत काळे यांना जाग आली.त्यांनी या घटनेची माहिती पोलिस पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली.

सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील बाळकृष्‍ण पिसे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व गावाला माहिती कळवली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गाव सतर्क झाल्याचे लक्षात आल्याने चोरांनी घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या घटनेने ग्राम सुरक्षा यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *