Headlines

खरंच की काय! Radhika Apte नं स्वत:च्या लग्नात केला असा प्रकार, “जेवण आणि फोटो…”

[ad_1]

Radhika Apte : राधिका आपटेने (Radhika Apte) आपल्या अभिनयानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. ओटीटीवर राधिकाला ओटीटीवरील क्वीन म्हटले जाते. मराठी, तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा विविध भाषांच्या चित्रपटांतून तिने अप्रतिम भुमिका केल्या आहेत. परंतु तिला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. (radhika apte says she didnt click any photo on her wedding day see what she says more about her wedding)

आज तिला ओटीटीवरील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री म्हणूनच जास्त प्रसिद्धी आणि ओळख मिळाली आहे. राधिकानं लंडन येथील संगीतकार बेनडिक्ट टेलर ह्याच्याशी विवाहगाठ बांधली आहे. परंतु तुम्हाला राधिकाच्या लग्नातला हा एक किस्सा माहिती आहे का? 

राधिकाची बेनेडिक्ट टेलरशी भेट झाली. वर्षभर रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर राधिका आपटेनं त्याच्याशी लग्न केले होते. बेनेडिक्ट हा व्यवसायानं व्हायोलिक वादक आणि संगीतकार आहे. 

एका मुलाखतीदरम्यान राधिकानं तिच्या लग्नाचा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली, जेव्हा मी 10 वर्षांपुर्वी बेनेडिक्टशी लग्न केले होते तेव्हा आम्ही लग्नात आमचे फोटो काढायला विसरलो होतो. आम्ही डू इट युवरसेल्फ पद्धतीनं लग्न केले होते. ज्यात आम्ही आमच्या लग्नात जेवणही स्वतःच बनवले होते. माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. मी फक्त लग्न केले कारण व्हिसा ही एक मोठी समस्या होती आणि आम्हाला एकत्र राहायचे होते.” 

राधिका आपटेच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘विक्रम वेधा’, ‘मिसेस अंडरकव्हर’ आणि ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ यांचा समावेश आहे. राधिकाने ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राधिका तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही किंवा सोशल मीडियावर फोटो शेअर करत नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *