Headlines

‘द आर्चीज’च्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘खरं सांगू तर मला…’

[ad_1]

Agastya Nanda On The Archies : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने नुकतंच सिनेसृष्टीत पदार्पण केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर हे बॉलिवूडचे स्टार किड्स झळकले. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे अगस्त्य नंदाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता अगस्त्यने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाला. यावरुन कलाकारांना ट्रोलही करण्यात आले. आता नुकतंच अगस्त्य नंदाने फिल्म कंपेनियनला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ‘द आर्चीज’ या चित्रपटावरुन झालेल्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने भाष्य केले. 

“मला असं कधीच वाटलं नव्हतं”

यावेळी तो म्हणाला, “माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अशाप्रकारे नकारात्मक प्रतिक्रिया येतील, याचा मी कधी विचारही केला नव्हता. माझ्या चित्रपटातील अभिनयावर इतकी टीका होईल, असेही मला कधी वाटले नव्हते. मी खरं सांगू तर मला या सर्व गोष्टींना कसं तोंड द्यायचं हेच कळत नव्हतं. जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात येण्यासाठी पूर्णपणे तयार नसता आणि तेव्हा अनेक लोकांची विविध मतं असतात. पण हे ठीक आहे.” 

“मी आणखी प्रयत्न करेन”

“पण प्रत्येकाला स्वत:चे मत असावं. पण मला तेव्हा काय होतंय, काय करावं, काहीच कळत नव्हतं. काहींना हा चित्रपट खूप वाईट वाटला तर काहींना तो आवडला. त्याचवेळी काही लोकांना याबद्दल काही फरकच पडला नाही. पण काहीही हरक नाही.  त्याचवेळी काही लोकांना काही फरक पडला नाही. काही हरकत नाही. हा चित्रपट काही ठिकाणी चालला नाही. हा माझा पहिलाच प्रयत्न होता. पण मी कठोर परिश्रम करेन आणि पुन्हा उभा राहिन. दुसरा प्रयत्न करेन. तेव्हाही जर काही झालं नाही, तर तिसरा, चौथा… असे प्रयत्न करतच राहिन. पण मला हे लक्षात यायला वेळ लागला”, असेही अगस्त्य नंदाने सांगितले. 

दरम्यान आता अगस्त्य नंदा लवकरच एका नवीन चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. या चित्रपटाचे नाव इक्किस असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *