Headlines

अभिनेत्रीच्या लहान मुलासोबत भर बाजारपेठेत काय घडलं? घटनाक्रम सांगताना ‘ती’ संतापतच म्हणाली…

[ad_1]

Urmila Nimbalkar Post : अभिनेत्री आणि लोकप्रिय यूट्यूबर उर्मिला निंबाळकर हिचा स्ट्रगल आणि आतापर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. कायम मनमोकळेपणाने व्यक्त होणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. उर्मिला कायमच सोशल मीडियावर आपला भावना मांडत असते. मग ते तिच्या करिअरच्या असो किंवा खासगी आयुष्याच्या.. 

उर्मिलाने यूट्यूब चॅनल ते अगदी अथांगची आई होण्यापर्यंतचा प्रवास आपल्या चाहत्यांसोबत मांडला. अनेकदा ती अथांगचे व्हिडीओ देखील शेअर करत असते. असं असताना अनेक कलाकारांच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घेण्यात अनेक प्रेक्षकही उत्सुक असतात. यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी आपले असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण होते. पण हीच भावना कधी आपली मर्यादा ओलांडते हे कळत नाही. 

असाच एक प्रसंग उर्मिला, सुकिर्त आणि अथांगसोबत घडला आहे. याबाबत उर्मिलाने ‘एक कळकळीची विनंती’ अशी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने घडलेला प्रसंग आणि एक विनंती केली आहे. 

घडलेला प्रसंग 

उर्मिला, सुकिर्तसोबत अथांग आकाशकंदिलाच्या खरेदी करता गेला होता. त्यावेळी मागून एक अचानक बाई आल्या आणि त्यांनी अथांगला पकडलं आणि जोरात गाल ओढी लागल्या. या सगळ्या प्रसंगाने अथांग खूप घाबरला आणि रडू लागला. अथांग आणि या वयातील लहान मुलांसाठी Stranger Danger अशी भावना आहे. 

सोशल मीडियामुळे अथांगबद्दल प्रेम, भावना वाटणे हे स्वाभाविकच आहे. पण त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून फोटो काढणे, तो रडत असतानाही त्याला ओढून घेणे, बाहेरील अस्वच्छ हाताने त्याचे गालगुच्छे घेणे हे चांगले नाही. वरुन तो हात लावू देत नाही म्हणून पाठमोरे होऊन त्याला नावं ठेवणे हे अयोग्य आहे आणि अथांगसाठी असुरक्षित.. 

उर्मिलाने आपल्या मनातील भावना अशी व्यक्त केली आहे. आई म्हणून बाळासाठी वाटणारी काळजी आणि एक प्रकारचा त्रास उर्मिलाने या पोस्टगद्वारे शेअर केला आहे.  

उर्मिला अनेकदा अथांग आणि तिच्या कुटुंबाच्या पोस्ट शेअर करत असते. पण तिला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागेल याचा विचार देखील तिने केला नव्हता. पण हा ्प्रसंग घडल्यानंतर तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. सेलिब्रिटी असले तरीही त्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावं लागणं हे चांगल नाही. मुलांना आलेला हा अनुभव अतिशयच कठिण आणि त्रासदायक असतो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *