Headlines

‘…म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही’; सनी देओलची मोठी घोषणा

[ad_1]

MP Sunny Deol : गदर-2 (Gadar 2) चित्रपटाच्या यशानंतर चित्रपट अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) सध्या जोरदार चर्चेत आहे. याचदरम्यान, सनी देओलने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल यांनी मी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार नाही, अशी घोषणा केली आहे. अभिनेता बनून राहणे हीच माझ्यासाठी निवडणूक आहे. मला वाटते की मी एक अभिनेता म्हणून देशाची सेवा केली पाहिजे, जी मी करत आलो आहे, असे सनी देओलने म्हटलं आहे. त्याच्या या घोषणेनंतर भाजपलाही मोठा धक्का बसला आहे.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असतानाच त्याने ही मोठी घोषणा केली आहे. अभिनेता असण्यासोबतच सनी देओल पंजाबमधील गुरुदासपूरमधून भाजपचे खासदार देखील आहे. दरम्यान, सनी देओलने एका मुलाखतीत सांगितले की, मी पुढील निवडणूक लढवणार नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपण पक्षाचे उमेदवार होणार नसल्याचे सनी देओलने सांगितले आहे. अभिनय ही माझी निवड आहे, असे सनी देओल म्हणाला आहे.

“केवळ अभिनेता म्हणून देशाची सेवा करावी, असे मला वाटते. एकाच वेळी अनेक गोष्टी करणे अशक्य आहे. एका वेळी एकच गोष्ट करता येते. ज्या विचाराने ते राजकारणात आले, त्याच विचाराने त्यांना अभिनेता म्हणूनही काम करता येईल. त्यामुळेच मी पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे भाजप खासदार सनी देओल यांनी सांगितले.

लोकसभेतल्या उपस्थितीवर सनी देओल काय म्हणाला?

खासदार म्हणून सनी देओलची लोकसभेतील उपस्थिती केवळ 19 टक्के आहे. यावर सनी देओल म्हणाला की, “देश चालवणारे लोकसभेत बसतात. त्यात सर्व पक्षांचे नेते आहेत. पण तिथे ज्या प्रकारची वागणूक दिली जाते, त्याबद्दल आपण इतरांना असे करू नका असे सांगतो. जेव्हा मी त्यांना पाहतो तेव्हा मला कुठेतरी जावेसे वाटते कारण मी तसा नाही. मला यापुढे निवडणूक लढवायची नाही.”

दरम्यान, चित्रपट अभिनेता सनी देओलने आपला राजकीय प्रवास 2019 मध्ये सुरू केला होता. सनी देओल 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. गुरदासपूरच्या जनतेने सनी देओलला 84 हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवून दिला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *