Headlines

‘त्यात इंदिरा गांधींचा फोटो नव्हताच!’ व्हायरल व्हिडीओनंतर काय म्हणाला शुभनीत सिंग

[ad_1]

Canadian Singer Shubhneet Singh Controversy: भारतीय वंशाचा कॅनेडियन गायिका शुभनीत सिंग (Shubhneet Singh) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लाइव्ह वे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान हुडी दाखवताना दिसत आहे. शुभने दाखवलेल्या हुडीवर पंजाबचा नकाशा आणि त्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (indira gandhi) यांच्या हत्येची प्रतिमा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओवरुन आता नवा वाद उफाळून आलाय. अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) टीका केल्यानंतर टीका केल्यानंतर शुभनीतने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

शुभनीत सिंगने त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची खिल्ली उडवल्याचा दावा करण्यात येत आहे. शुभनीत सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो एका कॉन्सर्टदरम्यान हुडी दाखवत आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या हुडीजमध्ये सतवंत सिंग आणि बेअंत सिंग इंदिरा गांधींची हत्या करताना दिसत आहेत, असे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला यापुढे शुभनीतची गाणी ऐकायची नाहीत अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

या हुडीच्या वादावर गायक शुभने अखेर मौन तोडले आहे. त्यांनी एक इन्स्टा स्टोरी पोस्ट करुन मी काहीही केले तरी लोक माझ्या विरोधात उभे राहतात, असे शुभने म्हटलं आहे. “मी काहीही केले तरी काही लोक माझ्या विरोधात काहीतरी शोधून काढतात. लंडनमध्ये माझ्या पहिल्या शोमध्ये प्रेक्षकांनी माझ्यावर बरेच कपडे, दागिने आणि फोन फेकले होते. मी तिथे परफॉर्म करण्यासाठी आलो होतो, माझ्यावर काय फेकले गेले आणि त्यात काय आहे हे पाहण्यासाठी नाही. तुम्हा सर्वांसाठी परफॉर्म करण्यासाठी टीमने गेल्या काही महिन्यांपासून खूप मेहनत घेतली आहे. द्वेष आणि नकारात्मकता पसरवणे थांबवा,” असे शुभने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

Singer Shubhneet Singh

दरम्यान,  फॅक्टचेकमध्ये शुभने जी हुडी दाखवली होती त्यावर फक्त पंजाबचा नकाशा होता, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येशी संबंधित कोणतीही गोष्ट नव्हती. या हुडीवर पंजाबचे सर्व जिल्हे छापलेले होते, जे संगीत कार्यक्रमादरम्यान एका प्रेक्षकांनी शुभला दिले होते. शुभने दाखवलेली हुडी आणि ज्या हुडीबद्दल दावा केला जात आहे ती अगदी सारखीच दिसते. त्यामुळे हा दावा पूर्णपणे खोटा आहे, असेही म्हटलं जात आहे. तसेच  इंदिरा गांधींच्या हत्येची जी हुडहुडी काढली जात आहे, ती ‘अकाल क्लोदिंग’ नावाच्या खलिस्तान समर्थक कंपनीने बनवली आहे. अकाल क्लोदिंगनेही हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *