Headlines

ठाणे : कोपरी प्रभाग समितीच्या इमारतीचा बाहेरील सज्जा पडला | Thane Part of Kopari Ward Committee building collapsed msr 87

[ad_1]

ठाणे येथील कोपरी भागातील महापालिकेच्या प्रभाग समिती इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा बाहेरील सज्जा आज (सोमवार) दुपारी पडला. या घटनेत कुणीही जखमी झालेले नसले तरी दोन दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने इमारतीमधील कार्यालय तत्काळ बंद केले असून, ते इतरत्र हलविण्यासाठी पावलं उचलली आहेत.

ठाण्यात ७४ पैकी २९ अतिधोकादायक इमारतीच रिकाम्या

ठाणे महापालिकेचे कोपरी येथील दौलतनगर भागात प्रभाग समिती कार्यालय आहे. तळ अधिक तीन मजली अशी ही इमारत आहे. ३५ वर्षे जुनी ही इमारत असून ती धोकादायक इमारतींच्या यादीत आहे. तरीही या इमारतीमध्ये पालिकेचा कारभार सुरुच होता. सोमवारी दुपारी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जाचा भाग खाली पडून दोन दुचाकींचे नुकसान झाले. याशिवाय, प्रभाग समिती कार्यालय परिसरात उभारण्यात आलेली पावसाळी शेडही पडली.

कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण, कार्यालयाबाहेर धाव घेतली –

या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आणि त्यांनी कार्यालयाबाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, आरसीसी सल्लागार यांनी धाव घेऊन इमारतीची पाहाणी केली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने इमारतीमधील कार्यालय तत्काळ बंद केले असून ते इतरत्र हलविण्यासाठी पावलं उचलली आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *