Headlines

ठाणे : पहिल्या पंधरवड्यात सहा तालुक्यात ८०० मिमी पेक्षा अधिक पाऊस | Thane More than 800 mm rainfall in six taluks in first fortnight msr 87

[ad_1]

यंदाच्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ ३३.३ टक्के इतक्याच पावसाची नोंद करण्यात आली होती. यामुळे राज्यात जून महिन्यात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर येऊन पोहचला होता. परंतु, जुलै महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात जिल्ह्यात तब्बल ८५०.४ मिमी इतक्या पाऊस झाला असून सरासरीच्या १९९.८ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्यात तब्बल ३१७.७ टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. तर उर्वरित ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर या तालुक्यांमध्ये ८०० मिमी हुन अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मुरबाड तालुक्यात ६५७.९ मिमी इतका पाऊस झाला आहे. तर गेल्या चोवीस तासाच्या कालावधीत जिल्ह्यात ९२.६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच ठाणे जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. महिन्याच्या सुरवातीला झालेला पाऊस हा प्रामुख्याने शहरी भागात होताना दिसून येत होता. तसेच जिल्ह्याला पाणी पूरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या परिसरात अगदी कमी पाऊस पडला असल्याने जिल्ह्यावर पाणी कपातीचे संकट ओढवले होते. परंतु, दुसऱ्याच आठवड्यात जिल्हयाच्या ग्रामीण भागासह शहरी भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १९९.८ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्यात तब्बल ९४७.४ मिमी इतका पाऊस झाला असून सरासरीच्या ३१७.७ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर या खालोखाल शहापूर तालुक्यात ९०८.१ मिमी, भिवंडी तालुक्यात ८७३.३ मिमी, उल्हासगर तालुक्यात ८७२.६, कल्याण ८६५ मिमी, ठाणे ८५८.७ मिमी आणि मुरबाड तालुक्यात ६५७.९ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

शहापूरला यंदा दिलासा –

शहापूर तालुक्याला प्रामुख्याने टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी शहापूर तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या ७२.६ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती. तर मागील महिन्यात केवळ ४५.३ टक्के इतकाच पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे डोळे जुलै महिन्यातील पावसाकडे लागले होते. यंदाच्या जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शहापूर तालुक्यात तब्बल ९०८.१ मिमी इतक्या पाऊस झाला असून सरासरीच्या २१२.३ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा शहापूर तालुक्याला चांगल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *