Headlines

थंडीमुळे फोनच्या स्क्रीन-Speaker-Battery चे होऊ शकते नुकसान, हिवाळ्यात अशी घ्या फोनची काळजी

[ad_1]

नवी दिल्ली: Smartphone Tips For Winter:स्मार्टफोन कोल्ड आणि हिट परिस्थितीनुसार बनवले जात असेल तरी थंडी जास्त असेल तर स्मार्टफोच्या लाईफवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, आयफोन -२०° आणि ११३ ° फॅरेनहाइट तापमानात काम करू शकतो. पण, जास्त काळ अति तापलेल्या किंवा थंड तापमानात राहिल्याने स्मार्टफोनची लाईफ कमी होते हे देखील तितकेच खरे आहे. यामुळे जो स्मार्टफोन ४ वर्षे टिकू शकतो, त्याची लाईफ २ वर्षांपर्यंत कमी होऊ शकते. अनेकदा तर फोन बंद किंवा फ्रीज देखील होऊ शकतो. Apple ने स्मार्टफोनला किमान उणे ४ अंश आणि कमाल ३२° फॅरेनहाइट तापमानात चालवण्याचा सल्ला दिला आहे.

वाचा: Smartphone मध्ये अचानक ‘असे’ बदल दिसत असतील तर व्हा अलर्ट, Hacking ची दाट शक्यता

खूप थंड आणि गरम तापमान असेल तर फोनवर काय फरक पडतो?

जेव्हा Lithium ion Battery थंड तापमानाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांची कार्यक्षमता कमी होते. थंडी जास्त असेल तर फोनची बॅटरी लवकर संपते. रिपोर्टनुसार, प्रचंड थंडीत फोनची बॅटरीच नाही तर LCD Screen ही खराब होऊ शकते.

बर्फाच्छादित तापमानात स्मार्टफोनच्या Glass Surface वर तडे जाण्याची शक्यता असते. त्याच थंड तापमानात आयफोनच्या मागील बाजूची काचही फुटू शकते. याशिवाय, हिवाळ्यात धुक्यामुळे तुमच्या फोनचा स्पीकर खराब होण्याची देखील शक्यता असते. कारण, हिवाळ्यात ओलाव्यामुळे स्पीकरमध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

वाचा: Jio चा सुपरहिट प्लान, वर्षभरापर्यंत मिळणार Unlimited Calling-Data, पाहा इतर बेनेफिट्स

हिवाळ्यात फोनची अशी घ्या काळजी:

स्मार्टफोनला खूप थंड ठिकाणी ठेवू नका. थंडीत स्मार्टफोन व्यक्तीच्या खिशात ठेवा, त्यामुळे स्मार्टफोन थोडी उष्णता मिळते. थंडीत रात्री फोन बंद ठेवावा.
तसेच, थंडीत स्मार्टफोन उबदार जॅकेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप थंडी असेल तर, स्मार्टफोनला योग्य पद्धतीने कव्हर देखील करून ठेवू शकता हे त्याचे तापमान योग्य ठेवेल. लांबच्या प्रवासात फोन पॉवर बँकेशी कनेक्टेड ठेवणे देखील चांगला पर्याय आहे.

वाचा: Buying Smartphone: नवीन वर्षात स्मार्टफोन खरेदीचा विचार आहे ? या चुका टाळा, नुकसान होणार नाही

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *