Headlines

Thackeray vs Shinde: निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले “काही तोतये…” | Shivsena Uddhav Thackeray on Shinde Faction Election Commission sgy 87

[ad_1]

राज्यात सत्तांतर झाल्यानतंर ‘खरी शिवसेना कोणाची’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरु आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेलं असून, पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगापुढील सुनावणी स्थगित करावी, अशी विनंती शिवसेनेने केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळावा, निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांनाही लक्ष्य केलं.

SC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार

“माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ आहेत ते माझ्यासोबत आहेत. ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवनेरीचा अपमान आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“गटप्रमुखांच्या मेळाव्यात मी बोलले होतो ते पुन्हा बोलेन. आपल्याला देवाने दिलेली ही एक संधी आहे. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व जोपासणं, वाढवणं ही संधी आपल्याकडे आहे. इतिहासात तोतयांचे बंड असं एक प्रकरण आहे, असे काही तोतये फिरत आहेत. पण नुसतं हातात भगवा असून फायदा नाही, तर ह्रदयात भगवा हवा,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी १३० वकिलांची फौज; सरन्यायाधीशांच्या मुलाचाही समावेश

“दसऱ्याला थोडेच दिवस शिल्लक आहेत. वाजत गाजत, गुलाल उधळत तुम्ही सर्व येणारच आहात. शिस्तीने या अशी विनंती आहे. आपल्याकडून वेडवाकडं करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करतील, पण तुम्ही सावध राहा,” असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

“आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती कोर्टातील असो किंवा निवडणूक आयोगातील असो. पण आम्ही जनतेच्या मनाला महत्व देतो. त्यांच्या मनातील लढाई आपण जिंकलीच आहे. लोकांच्या भावना तशाच कायम ठेवा,” असंही ते म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *